शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल अन् मद्याने कालवले अनेकांच्या संसारात विष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 11:02 IST

गेल्या वर्षभरात अशी शेकडो प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाकडून केले जात आहे.

- हितेन नाईक

पालघर : मोबाइलमुळे वाढता विसंवाद, मद्य पिण्याचे वाढते प्रमाण तसेच चारित्र्यावर संशय आहे, अशा विविध कारणांमुळे गृहकलहात वाढ होताना दिसत आहे. वाढते वाद मिटल्यास अखेर अनेक संसार सुखीदेखील होतात, असेही दिसून आले आहे.

गेल्या वर्षभरात अशी शेकडो प्रकरणे दाखल झाली आहेत. यातील बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशन करून त्यांचे संसार पुन्हा फुलविण्याचे काम या विभागाकडून केले जात आहे. मोबाइल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वाढता वापर, मद्य आणि नशा, हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणारे छळ, आदी कारणांमुळे पती-पत्नीत वाद होऊन प्रकरण पोलीस ठाणे आणि न्यायालयात पोहोचण्याच्या प्रमाणात अलीकडे वाढ झाली आहे. त्यातील पुढे काही प्रकरणे काडीमोडापर्यंत देखील पोहोचली आहेत.

पती-पत्नीमधील वादांची ही प्रकरणे सर्वप्रथम भरोसा सेलकडे जातात. या ठिकाणी दोघांचे समुपदेशन करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात यश न आल्यास नाइलाजाने गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जातो. लिव्ह इन रिलेशनमध्ये पाच वर्षे राहणाऱ्या दोन तरुण-तरुणींनी घरातून पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. त्या तरुणीचा मोबाइल चेक करणे, संशय घेणे, आदी बाबींसह मला आणि वडिलांना सकाळी डबा देत नाही, अशा अनेक कारणांसह हे प्रकरण भरोसा सेलकडे आल्यावर दोघांतील गैरसमज दूर करीत पुन्हा त्यांना एकत्र आणण्यात भरोसा सेलला यश आले.

चारित्र्यावर संशय हेच कारण-    २०२०-२१ मध्ये १३ तक्रारी या चारित्र्यावर संशय घेतल्याप्रकरणी भरोसा सेलकडे आल्या होत्या. -   मोबाइलवर बोलणे, फेसबुक, व्हॉट्सॲप, सोशल मीडियावर नेहमी व्यग्र राहणे, हुंडा, मुलगा-सून त्रास देतात, जमीन वाद, परस्त्रीशी विवाहबाह्य संबंध, आई-वडिलांचा त्रास, कौटुंबिक कलह, व्यसनाधीनता आदी तक्रारी येत आहेत.

नेहमी आईशी बोलते म्हणून वादतक्रारींमध्ये नेहमी आईशी बोलणे, कौटुंबिक कलह, हुंडा,आई-वडिलांचा त्रास, मुलगा-सुनेचा त्रास, बहीण-भाऊ वाद, पतीचा चारित्र्यावर संशय आदी तक्रारीची कारणे आहेत.

बायकोचा जाच वाढलापत्नीचाही जाच वाढल्याची प्रकरणे समोर येऊ लागली असून सन २०२० आणि २०२१ मध्ये प्रत्येकी एक-एक तक्रारीची नोंद करण्यात आलेली आहे. महिलांना कायद्याने दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून काही महिलांकडून पतीविरोधात तक्रारी केल्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पुरुषांचा मनस्ताप वाढत आहे.

संसारात फुलले हास्य२०२० मध्ये एकूण २३ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील २१ तक्रारीमध्ये यशस्वीरीत्या समझोता करण्यात भरोसा सेलला यश आले असून २ तक्रारींमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.२०२१ मध्ये ४१ तक्रारी प्राप्त झाल्या असून १९ प्रकरणात यशस्वी समझोता झाला तर ८ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले. उर्वरित १४ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्याच्या दृष्टीने भरोसा सेलचे वरिष्ठ अधिकारी कलगोंडा हेगाजे हे टीमच्या सहकार्याने प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी