बेपत्ता निर्मल सुरतला सापडला

By Admin | Updated: August 19, 2016 01:59 IST2016-08-19T01:59:19+5:302016-08-19T01:59:19+5:30

वसईतून बेपत्ता झालेला १४ वर्षांचा निर्मल वाघ हा शाळकरी मुलगा वसई पोलिसांच्या तत्परतेुळे सुरत येथे सापडला. काश्मिरच्या आकर्षणापोटी त्याने घर सोडलें होतें. निर्मलने

The missing neat Surat was found | बेपत्ता निर्मल सुरतला सापडला

बेपत्ता निर्मल सुरतला सापडला

वसई : वसईतून बेपत्ता झालेला १४ वर्षांचा निर्मल वाघ हा शाळकरी मुलगा वसई पोलिसांच्या तत्परतेुळे सुरत येथे सापडला.
काश्मिरच्या आकर्षणापोटी त्याने घर सोडलें होतें. निर्मलने सूरतहून एका मित्राच्या मोबाईलवर मिस कॉल दिला होता. त्यावरून पोलिसांनी निर्मलला शोधून काढले.
निर्मल वाघ (१४) हा मुलगा वसईच्या प्रभू आळी येथे वडिलांसवेत राहतो. तो वसईच्या ए.जी.परूळेकर शाळेत दहावीला शिकतो. गेल्या बुधवारी तो नेहीप्राणे दहावीच्या शिकवणीवर्गासाठी गेला होता. मात्र नेहमीसारखा रात्री तो घरी न परतल्याने त्याच्या घरच्यांनी घाबरून जाऊन शोधाशोध सुरू करण्यात आली. मात्र त्याचा ठावठिकाणा न सापडल्याने वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
१४ आॅगस्टला निर्मलच्या मित्राच्या मोबाईलवर काही मिस्ड कॉल आले होते. तो कॉल सुरत येथून आला होता. ज्या ठिकाणाहून मिस कॉल आला होता ते ठिकाण वसई पोलिसांनी नेटवर्क वापरून शोधून काढले आणि तेथे एका पाणीपुरी विक्रेत्याकडे निर्मल सापडला. निर्मलला काश्मिरचे आकर्षण होते. त्या इच्छेपोटी त्याने घर सोडले होते. मात्र कसाबसा तो गुजरातेतच पोचू शकला. (प्रतिनिधी)

Web Title: The missing neat Surat was found