शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मीरा-भाईंदर पालिका घेणार १९ कोटींचे कचऱ्याचे डबे; ३,८८९ डब्यांच्या खरेदीसाठी निधीच्या उधळपट्टीचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:43 IST

महापालिकेने शासनाच्या मूलभूत सोयीसुविधांचा विकास अंतर्गत विविध क्षमतेचे कचऱ्याचे डबे खरेदी करण्यासाठी ३ डिसेंबर २०२४ रोजी निविदा प्रसिद्ध केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाने ३,८८९ कचऱ्याचे डबे खरेदी करण्यासाठी १९ कोटींच्या खर्चाची निविदा मंजूर केली आहे. त्यानुसार प्रत्येक डबा ३४ हजार ५११ रुपयांपासून थेट ९ लाख ३४ हजार ५६० रुपये इतका महागडा ठरणार आहे. एकीकडे सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा, खड्डेमुक्त मोकळे रस्ते - पदपथ देण्यास अपयशी ठरलेल्या व कर्जबाजारी महापालिकेने केवळ कचऱ्यांच्या डब्यांवर १९ कोटींची उधळपट्टी चालविल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

महापालिकेने शासनाच्या मूलभूत सोयीसुविधांचा विकास अंतर्गत विविध क्षमतेचे कचऱ्याचे डबे खरेदी करण्यासाठी ३ डिसेंबर २०२४ रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यातील दर हे अवाजवी असल्याने तत्कालीन आयुक्त यांनी फेरनिविदा काढण्याचे आदेश दिले. फेरनिविदेमध्ये कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर व अशोक इंटरप्रायझेस पात्र ठरले. निविदा समितीने कोणार्कची निविदा मंजुरीची शिफारस आयुक्तांना केली. दरम्यान भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी निविदेबाबत आयुक्तांकडे तक्रार केली असता आयुक्तांनी ९ जून रोजी विधी अधिकारी सई वडके यांचा अभिप्राय घेऊन निविदा समितीकडे पुन्हा बैठक आयोजित करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. निविदा समितीने कोणार्कची पुन्हा शिफारस केली असता ३० जून रोजीच्या प्रशासकीय सभेत आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी कोणार्कची निविदा व  १९ कोटी रुपयांच्या खर्चास ठरावाद्वारे मान्यता दिली. निविदेत, कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरला ३,८८९ कचऱ्याच्या डब्यांच्या खरेदीसाठी १८ कोटी ६५ लाख ३८ हजार ८०८ रुपये मंजूर केले आहे. 

असे आहेत डबे आणि त्यांच्या किमतीफायबरचे डबे १२० ली., २४० ली. व १९० लीटर क्षमतेचे असून हा डबा ३४,५११ रुपये किमतीचा आहे. या दराने २ हजार ८६८ डब्यांसाठी ९ कोटी ८९ लाख ७७ हजार खर्च होणार आहे.सोलार पॅनलसह ऑटोमॅटिक कचऱ्याचे २१ डबे खरेदी करण्यात येणार असून एका डब्याची किंमत ९ लाख ३४ हजार ५६० रुपये इतकी आहे. स्टेनलेस स्टील, पावडर कोटेड किंवा ॲल्युमिनियम असे तीन प्रकारच्या डब्यांचे ५०० संच घेतले जाणार आहे. या प्रति संचाची रक्कम ६९ हजार ६८८ रुपये इतकी असून २ डब्यांच्या ५०० संचाची खरेदी केली जाणार आहे.

कचऱ्याचे डबे खरेदीची आवश्यकताच नाही. याआधी डबे दिले गेले होते ते वर्षभर टिकले नाहीत. अनेक डबे चोरीला गेले. निविदा प्रक्रिया आणि त्यातील दर हे चुकीचे असल्याबद्दल तक्रार केली होती. पालिकेने कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर हा ठेकेदार निविदेत बसेल अशा जाणीवपूर्वक अटीशर्ती ठेवल्या. नरेंद्र मेहता, आमदार

भयंकर बनलेली डम्पिंग समस्या सोडवण्यासाठी निधीद्वारे ठोस पावले उचलत नाहीत. कचऱ्याच्या डब्यांसाठी १९ कोटींची उधळपट्टी करण्यास प्रशासनाला लाज वाटत नाही का? बर्नड डिमेलो,मच्छीमार नेते

पालिकेत नगरसेवक असताना देखील कचऱ्याचा डबे घोटाळा असाच अव्वाच्या सव्वा किंमत देऊन केला होता. हा शासनाच्या पैशांचा अपव्यय आणि भ्रष्टाचार असून याबाबत आपण तक्रार केली आहे.ॲड. कृष्णा गुप्ता, अध्यक्ष, सत्यकाम फाउंडेशन

ठेकेदारास अजून कार्यादेश दिलेला नाही. शासन दरसूचीमध्ये दर नसल्याने चालू बाजारभावाच्या दरानुसार निश्चित करून पारदर्शक प्रक्रिया करून निविदा मंजूर केली आहे.  निविदेतील दराबाबत पुन्हा तांत्रिक बाबी तपासून निर्णय घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. डॉ. सचिन बांगर, उपायुक्त, महापालिका

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक