शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

मीरा भाईंदर महापालिकेने कंत्राटी ६६० सुरक्षा रक्षक काढून टाकल्याने अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा बलाचे जवान नेमणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 19:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी महापालिकेच्या विविध मालमत्ता ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या ठेकेदाराची मुदत २०१८ सालीच संपुष्टात आलेली असल्याने ठेका रद्द केला आहे . त्यामुळे ६६० सुरक्षा रक्षक हे  सेवेतून कमी केल्याने त्यांच्या वेतनावर दर महिना १ कोटी ३५ लाख इतका खर्च वाचेल असा प्रशासनाचा दावा आहे . तर अत्यावश्यक ठिकाणी सुरक्षा रक्षकांची गरज नुसार अहवाल देण्यास विभाग प्रमुखांना आयुक्तांनी सांगितले असून तेथे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान नेमले जाणार आहेत . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या शाळा , उद्याने , मैदाने , सभागृह , विविध कार्यालये , स्मशान भूमी , वाचनालय, पाण्याची टाकी, डम्पिंग आदी मालमत्तांच्या ठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक नेमले जात होते . सैनिक सिक्युरिटी ह्या ठेकेदारा मार्फत ६६० सुरक्षा रक्षक पालिकेच्या सेवेत नेमण्यात आले होते . काम करणाऱ्या ह्या सुरक्षा रक्षकां मध्ये काही तत्कालीन नगरसेवक व राजकारणी, काही अधिकारी आदींच्या वशिल्याने देखील अनेक जण काम करत होते . 

महापालिका आयुक्त काटकर यांनी सुरक्षा रक्षकांचा आढावा घेताना प्रशासकीय बैठकीत सैनिक सिक्युरिटीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला व त्या नुसार १ ऑक्टोबर पासून ठेका रद्द केला गेला . सदर ठेकेदाराची मुदत २०१८ सलातच संपलेली होती. त्यावेळी महासभेने सुरक्षा रक्षक मंडळ , सानपाडा यांच्या कडून माहिती घेऊन पुढील प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत सैनिक सिक्युरिटीला मुदतवाढ देण्याचा ठराव केला होता . 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार सैनिक सिक्युरिटी कडील कार्यरत सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्या करीता नोंदणीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे . परंतु सुरक्षा रक्षक मंडळ कडून त्यावर सुद्धा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही .  दुसरीकडे महापालिकेने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५० जवान सुरक्षेसाठी घेतलेले आहेत . त्यातील अधिकारी वर्गाला दिलेले जवान काढून घेण्यात आले आहेत . त्यांना पालिकेच्या अत्यावश्यक असलेल्या मालमत्तांच्या ठिकाणी सुरक्षेसाठी नेमले जाणार आहे . 

दरम्यान ६६० खाजगी सुरक्षा रक्षक कमी झाल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची पाळी आली आहे . अचानक हातची नोकरी गेल्याने ते हवालदिल झाले आहेत . तर ठेकेदाराचे समर्थक आणि सुरक्षा रक्षकांना नेमण्यात वशिलेबाजी करणाऱ्यांची सुद्धा धावपळ सुरु झाल्याची चर्चा आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर