शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुतीगृहाऐवजी नागरी आरोग्य केंद्रावर पालिकेनं केली बोळवण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2019 18:44 IST

मीरारोड येथील आरक्षण क्रमांक २१७ दवाखाना व प्रसुतीगृहासाठी राखीव ठेवला. त्यातील २५ टक्के जागा पालिकेकडे  हस्तांतर करणे अपेक्षित असतानाही सेव्हन इलेव्हन कंपनीने ती जागा हडपण्याचा डाव आखला होता.

भाईंदर - मीरारोड येथील आरक्षण क्रमांक २१७ दवाखाना व प्रसुतीगृहासाठी राखीव ठेवला. त्यातील २५ टक्के जागा पालिकेकडे  हस्तांतर करणे अपेक्षित असतानाही सेव्हन इलेव्हन कंपनीने ती जागा हडपण्याचा डाव आखला होता. तो हाणून पाडण्यासाठी समाजसेवक प्रदीप जंगम यांनी गेल्या ७ दिवसांपासून पालिका मुख्यालयाजवळ उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेत प्रशसानाने शनिवारी तेथे नागरी आरोग्य केंद्र सुरू केले. प्रामुख्याने प्रसुतीगृहाची मागणी असतानाही प्रशासनाने उपोषणकर्त्यांची नागरी आरोग्य केंद्रावर बाळवण केली. मात्र उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या लेखी आश्वासनावर उपोषण मागे घेतल्याचे जाहिर केले. 

पालिकेने शहर विकास योजनेंतर्गत मौजे गोडदेव येथील सर्व्हे क्रमांक २४ (३३८) पै ३, २६(३३४) पै ४ व २७ (३३१) या जागेत दवाखाना व प्रसुतीगृहाचे आरक्षण क्रमांक २१७ टाकले असता त्यावर सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीने २०१२ मध्ये दुमजली खासगी रुग्णालय बांधले. तत्पूर्वी मूळ आरक्षणात बदल होणे अपेक्षित असताना तसे न करता रुग्णालय बांधल्याच्या परवानगीपोटी कंपनीने एकूण आरक्षणापैकी ४३३.०८ चौरस मीटर जागेत दवाखाना आणि प्रसुतीगृहाचे बांधकाम करुन पालिकेला देण्याचे मान्य केले होते. पण ती जागा कंपनीने पालिकेला दिली नाही. उलट ती जागा आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी कंपनीचे संस्थापक आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २०१६ मध्ये पत्रव्यहार करुन कंपनीला त्यातून सूट मिळावी, अशी मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी अमान्य केल्यानंतरही कंपनीने ती जागा पालिकेकडे हस्तांतर केली नाही. याविरोधात जंगम यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये बेमुदत उपोषण सुरु केले. त्यावेळी प्रशासनाने कंपनीला तीन महिन्यांत पालिकेला दवाखाना व प्रसुतीगृह बांधुन देण्याचे आदेश दिले. त्यानंतरही ती जागा पालिकेच्या ताब्यात न देता सत्ताधारी भाजपाने फेब्रूवारी २०१८ मधील महासभेत मुळ आरक्षणात फेरबदल करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी आणण्याचा प्रयत्न केला. अखेर तो महासभेपुढे न आणता मागे घेण्यात आला.

याविरोधात जंगम यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली. लोकायुक्तांनी पालिकेला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पालिकेने २० डिसेंबर २०१७ रोजी लोकायुक्तांना अहवाल पाठविल्यानंतर ४ जुलै २०१८ रोजी सुनावणी ठेवण्यात आली. सुनावणी होण्यापूर्वीच आयुक्त बालाजी खतगावकर यांनी कंपनीचे संचालक संजय सुर्वे यांच्यासोबत बैठक घेतली. त्यातील चर्चेअंती कंपनीने पालिकेला ती जागा देण्यास होकार दिला. तरीदेखील जागा ताब्यात मिळत नसल्याने जंगम यांनी ६ जानेवारीपासून पुन्हा उपोषण सुरु केले. त्याला भाजपाखेरीज सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिल्याने त्याची दखल घेत प्रशानाने शनिवारी प्रसुतीगृहाऐवजी त्या जागी नागरी आरोग्य केंद्र सुरु केले. तर प्रसूतीगृह सुरु करण्यासाठी किमान ६ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरीदेखील प्रसुतीगृहाची पहिली पायरी नागरी आरोग्य केंद्रापासून सुरू झाल्याचे मान्य करीत जंगम यांनी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेतल्याचे जाहिर केले. 

 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकhospitalहॉस्पिटल