शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

मीरा भाईंदरच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई! जप्त केलेल्या रसायनातून तयार झाले असते १२ हजार कोटींचे एमडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:50 IST

११ कोटींच्या एमडी सह काही हजार कोटींचे एमडी बनवण्या इतके साहित्य जप्त 

वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष ४ ने तेलंगणातील मेफेड्रोन अमली पदार्थ बनवणारा कारखाना उघडकीस आणत एमडी बनवण्याच्या रसायनांचा मोठा साठा जप्त केला आहे. त्या साहित्यातून तयार होणाऱ्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय किंमत सुमारे १२ हजार कोटी रुपयांच्या घरात असती अशी माहिती पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कारखान्यातून ५ किलो ७९० ग्रॅम एमडी व अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या ३५ हजार ५०० लिटर रसायन, ९५० किलो पावडर व इतर साहीत्य जप्त केले आहे. 

मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री व नशा सार्वजनिक ठिकाणी देखील उघडपणे चालत असते. अमली पदार्थांच्या तस्करीत काही पोलीस कर्मचारी देखील सापडले व अटक झाले. अमली पदार्थांची कारवाई देखील दिखाव्या पुरती असायची. विक्रेत्यांच्या मागचे तस्कर, सूत्रधार आणि उत्पादकां पर्यंत पोलीस पोहचतच नव्हते. गुन्हे शाखा १ ने एमडी बनवणारा कारखाना शोधून कारवाई केल्याचे काही अपवाद होते. 

मधुकर पांडेय यांच्या कार्यकाळात अमली पदार्थांची नशा, विक्री, तस्करी बेफाम झाल्याचे आरोप झाले. त्यानंतर आयुक्त पदी आलेल्या निकेत कौशिक यांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमली पदार्थांच्या विक्री - तस्करीतील भ्रष्ट नशा उतरवा आणि आयुक्तालय नशा मुक्त करा असे निर्देश दिले होते. पोलीस आयुक्तांनी देखील आढावा घेऊन अनेक फेरबदल करत अमली पदार्थ विरोधी शाखेची दोन शाखा केल्या.  

पोलीस आयुक्तांनी अमली पदार्थांची कारवाई वरवरची नको तर त्या मागचे रॅकेट शोधून उध्वस्त करा असे आदेश पोलिसांना दिले होते. गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद बडाख सह सहायक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक उमेश भागवत व पथकाने मीरारोड मध्ये ८ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेने काशिमीरा नाका जवळून पकडलेल्या बांग्लादेशी विक्रेती फातिमा मुराद शेख ( वय २३) रा. काजूपाडा, घोडबंदर मार्ग ह्या एमडी विक्रेत्या महिले कडून २१ लाखांचा मेफेड्रोन अमली पदार्थ जप्त केला होता.  तिच्या कडून तपासाची पुढील एक एक कडी जोडत एकूण १० जणांना पोलिसांनी अटक केली होती.  

एमडी बनवण्याचा कारखाना असल्याचा सुगावा लागताच एका अटक आरोपीला सोबत नेत तेलंगणा राज्यातील हैद्राबाद जवळच्या चेरापल्ली औद्योगिक वसाहतीतील नवदया कॉलनी भागातील एका कारखान्यावर सदर पोलीस पथकाने शुक्रवारी धाड टाकली. तेथे एमडी बनवले जात असल्याचे निष्पन्न झाल्याने मालक श्रीनिवास विजय वोलेटी हा त्याचा केमिकल तज्ञ साथीदार तानाजी पंढरीनाथ पटवारी या दोघांना अटक केली आहे. 

५ किलो ७९० ग्रॅम वजनाचे एमडी अंमली पदार्थ तसेच अंमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या ३५ हजार ५०० लिटर रसायन, ९५० किलो पावडर व इतर साहीत्य सापडले आहे. या ठिकाणी एमडी बनवण्यासाठी लागणारी यंत्रे मोठ्या प्रमाणात आहेत. औद्योगिक वसाहत असल्याने या ठिकाणी नियमित सरकारी यंत्रणा तपासणी करत असतात. मात्र एमडी अमली पदार्थ बनवला जात असल्याचा मागमूस स्थानिक प्रशासनास नसल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. 

शनिवारी मीरारोड येथील पोलीस आयुक्तालयात आयुक्त निकेत कौशिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सदर कारवाईची माहिती दिली. यावेळी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त संदीप डोईफोडे उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरVasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड