शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

मीरा-भार्इंदरच्या १६ कराटेपटूंची चमकदार कामगिरी, पदकांची लयलूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:35 IST

१७ देशांमधील दोन हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी; क्रीडा क्षेत्रातूनही अभिनंदनाचा वर्षाव

भार्इंदर : कर्नाटकमधील शिमोगा येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पुपील्स आॅलिम्पिकमधील कराटे स्पर्धेत सहभागी झालेल्या मीरा-भाइंदरमधील १६ कराटेपटूंनी चमकदार कामगिरी करत १० सुवर्णासह पाच रौप्य व १५ कांस्य पदकांची लयलूट केली.या स्पर्धेत भारत, अमेरिका, इंडोनेशिया, मेक्सिको, फ्रान्स, सेनेगल, नायजेरिया, श्रीलंका, जर्मनी, कॅमरून, नेपाळ, बेल्जीयम, मलेशिया, रिपब्लिक आॅफ काँगो, गॅबोन, भूतान, अँगोला या १७ देशांमधील दोन हजारांहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.काता व कुमीते या प्रकारात १२ वर्षांखालील १६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. काता प्रकारात स्वर्णी राणे हिने सुवर्ण तर सैज्ञा भोगटे हिने कांस्य पदक पटकावले.काता व कुमीते या दोन्ही प्रकारांत जान्हवी सोनावणे, हिरण्या गेहलोत व पार्थ पारेखने अनुक्रमे सुवर्ण व रौप्य, ईशान शेख, पवन पुजारी व हर्ष शेट्टीने प्रत्येकी कांस्य, पार्थ अगणानी, सैफ नागोटणे, मनवीत शेट्टी व सौरव पुत्रणने प्रत्येकी कांस्य व सुवर्ण, अभीदित्या व अबियाने प्रत्येकी कांस्य व रौप्य, अद्वैत पिल्लई व पौर्णिमा चेरावतने सुवर्ण व कांस्य अशा एकूण १० सुवर्णसह पाच रजत व १५ कांस्य पदकांची कमाई केली.मान्यवरांनी केला गौरवया १६ कराटेपटूंच्या चमूचे नेतृत्व प्रशिक्षक विजय शिगवण, विजय ताम्हणकर, अकलाक नागोटकर, श्रीकांत सोनावणे यांनी केले. या कराटेपटूंचा अमेरिकेचे मास्टर कराटेपटू पेरे मौदे, मलेशियाचे अनन भून, पुपील्स आॅलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मोते, सचिव मोहम्मद रफीज शेख यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

टॅग्स :bhayandarभाइंदरmira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदर