शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

शेंबड्या म्हणते, म्हणून शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने चिमुरडीला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 21:42 IST

वडिलांनी मुलाचा गुन्हा लपवला, वसईतील धक्कादायक घटना

नालासोपारा (मंगेश कराळे) :- शेजारी राहणारी लहान मुलगी चिडवले म्हणून १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने शेजारी राहणाऱ्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बंद घरात शाळकरी मुलीचा मृतदेह आढळल्याने वसई विरारमध्ये एकच खळबळ उडाली होती. पेल्हार पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही हत्येची घटना आरोपी मुलाच्या वडिलांना माहिती असूनही त्यांनी ही लपवली होती. मुलाने हत्या केल्यानंतर आरोपीच्या वडिलांनी मुलीचा मृतदेह बाजूच्या घरात टाकल्याची माहिती समोर आली आहे. सध्या अल्पवयीन मुलगा फरार असून आरोपी मुलाच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. 

वसई फाटा येथे ४ डिसेंबरला एका आठ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह बंद घरातील मोरीत आढळून आला. तिचे पाय नायलॉनच्या बेल्टने बांधलेल्या स्थितीत होते. मृत चिमुरडी चांदनी साह ही आठ वर्षीय होती. ती जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहे. १ डिसेंबरला सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान घराजवळील दुकानात आईस्क्रिम आणण्यासाठी दुकानात गेली आणि त्यानंतर ती अचानक गायब झाली. त्याबाबत मिसिंग तक्रार १ डिसेंबरला तिच्या वडिलांनी पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

घरच्यांनी चिमुकलीचा शोध घेणाऱ्या व्यक्तीला २० हजाराची रक्कम ही देण्याचे जाहीर केले होते. ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मागील एका चाळीत चिमुकलीचा मृतदेह आढळला. पाच नंबर बंद रुममध्ये मोरीत एका प्लास्टिकच्या गोणीत पाय बांधलेल्या अवस्थेत   कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन अहवालासाठी पाठवण्यात आला. चिमुकलीचा मृतदेह गळा दाबून मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

पोलिसांनी अधिक तपास केल्यावर, त्याच परिसरातील एक अल्पवयीन मुलगा गायब असल्याचे कळले. पोलिसांनी त्या मुलाच्या वडिलांजवळ चौकशी केली असता खुनाच्या हत्येचा उलगडा झाला आहे. मृत मुलगी शेजारी राहणाऱ्या मुलाला  शेंबड्या शेंबड्या चिडवत होती. रागाच्या भरात १ डिसेंबरला त्याने तिचा गळा दाबून हत्या केली. त्याने ही घटना वडिलांना सांगितली. वडिलांनी घटना लपवण्यासाठी चिमुकलीचा मृतदेह बंद खोलीमध्ये ठेवून त्याची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होते. सध्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे तर आरोपी अल्पवयीन मुलागा ही जालना येथे सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबतची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी दिली आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराVasai Virarवसई विरार