खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांना जमावाची मारहाण, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:29 IST2017-08-23T00:29:19+5:302017-08-23T00:29:22+5:30
वसई तालुक्यातील चांदीप रेती बंदरावर बेकायदेशीर रेती वाहतूक करणा-या ट्रकची तपासणी केल्याच्या रागात जमावाने जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारहाण केली.

खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांना जमावाची मारहाण, गुन्हा दाखल
पालघर : वसई तालुक्यातील चांदीप रेती बंदरावर बेकायदेशीर रेती वाहतूक करणाºया ट्रकची तपासणी केल्याच्या रागात जमावाने जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी मांडवी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत़ या प्रकरणी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे़ अशा घटना याआधीही राज्यभरात घडल्या आहेत़ न्यायालयानेही याची दखल घेत अधिकाºयांना संरक्षण देणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले होते़ अद्याप त्यावर सरकारने काही केले नाही़