आधार नंबर दया, नाही तर रेशन होणार बंद!

By Admin | Updated: February 17, 2016 01:43 IST2016-02-17T01:43:00+5:302016-02-17T01:43:00+5:30

तालुक्यातील एपिएल, बिपिएल, अंत्योदय रेशनकार्ड धारकांनी पुरवठा विभागामार्फत लवकरात लवकर आपले आधार कार्ड झेरॉक्स अगर त्यांचे नंबर आपल्या जवळच्या रेशनदुकानदारांकडे जमा करावेत.

Merge the support number, if not, the ration will stop! | आधार नंबर दया, नाही तर रेशन होणार बंद!

आधार नंबर दया, नाही तर रेशन होणार बंद!

तलवाडा : तालुक्यातील एपिएल, बिपिएल, अंत्योदय रेशनकार्ड धारकांनी पुरवठा विभागामार्फत लवकरात लवकर आपले आधार कार्ड झेरॉक्स अगर त्यांचे नंबर आपल्या जवळच्या रेशनदुकानदारांकडे जमा करावेत. ते न करणाऱ्या लाभार्थ्यांना रेशनचे धान्य मिळणार नाही. ही वेळ शक्यतो येऊ देऊ नये, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यांत आले आहे़
विक्रमगड तालुक्यात या अगोदर शासनाकडून अपात्र शिधापत्रिका (रेशनकार्ड) शोधमोहीम राबविण्यात आलेली आहेत़ परंतु त्यानंतर पात्र ठरलेल्या अनेक रेशनकार्डधारकांनी आपले आधार क्रमांक सादर केलेले नाहीत. त्यामुळे हे आवाहन करण्यात आले आहे. विक्रमगड तालुक्यात ९२ धान्यदुकानदार व ९६ किरकोळ केरोसिन दुकानदार परवानाधारक आहेत़ तर बीपीएल, अंत्योदय, एपीएल, व अन्नपूर्णा अशा एकूण- २७०९८ कार्डधारकांचा समावेश आहे़ त्यामुळे या कार्ड धारक लाभार्थ्यांना रेशनकार्डवर मिळणाऱ्या योेजनांचा लाभ यापुढे घ्यावयाचा असल्यास आधारकार्ड नंबर अगर त्यांची झेरॉक्स रेशनदुकानदारांकडे तातडीने जमा करावयाची आहे़ ज्यांनी
अजून आधारकार्ड काढलेले नाही अगर घेतलेले नाही त्यांनी नवीन आधारकार्डाकरीता विक्रमगड त्
ाहसिल कार्यालयाशी किंवा पाचमाड येथील केंद्राशी संपर्क साधावा व कार्ड घेऊन लवकरात लवकर
नंबर दयावेत, असे आवाहन केले
आहे.

Web Title: Merge the support number, if not, the ration will stop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.