एसटीतील महिलांच्या राखीव आसनांवर पुरूषांचा ठिय्या

By Admin | Updated: August 29, 2015 22:09 IST2015-08-29T22:09:23+5:302015-08-29T22:09:23+5:30

एसटी बसमधील महिलांसाठी आरक्षित आसनांवर पुरुषच ठिय्या देत असल्याने महिला प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे. येथून ठाणे, मुंबईसाठी बस प्रवास करतांना रोज सकाळी प्रवाशांची

Men's Stance on Women's Reserved Ashes in ST | एसटीतील महिलांच्या राखीव आसनांवर पुरूषांचा ठिय्या

एसटीतील महिलांच्या राखीव आसनांवर पुरूषांचा ठिय्या

- वसंत भोईर,  वाडा
एसटी बसमधील महिलांसाठी आरक्षित आसनांवर पुरुषच ठिय्या देत असल्याने महिला प्रवाशांतून संताप व्यक्त होत आहे.
येथून ठाणे, मुंबईसाठी बस प्रवास करतांना रोज सकाळी प्रवाशांची मोठी गर्दी असते. शिक्षण व नोकरी निमित्ताने बाहेर पडणाऱ्या अनेक तरुणी व महिला एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास मानत असल्या तरी, त्यांना हक्काच्या आरक्षित स्थानांवर बसता येत नाही. बस आल्यावर धक्काबुक्की करून पहिले जागा पकडणाऱ्यांना ती हक्काची वाटत असल्याने या आरक्षित आसनांंवर गदा आली आहे. या बाबत बऱ्याचदा वाहकाकडे तक्रार करुनही न्याय मिळत नसल्याचा अनुभव असल्याचे येथील महिला प्रवाशांनी लोकमतला सांगितले. विभाग नियंत्रक देखील याबाबतच्या तक्रारींकडे काणाडोळा करीत असल्याचा महिला प्रवाशांचा अनुभव आहे.

आमच्या जागा
आम्हालाच मिळाव्यात
यासंदर्भात वाड्यात बसने प्रवास करणाऱ्या महिला शुभांगी पालवे म्हणाल्या, महिलांसाठी ज्या आरक्षित जागा आहेत त्या आम्हालाच मिळाव्यात याकामी वाहकांनी पुढाकार घेऊन महिलांना आसन मिळवून द्यावे असे त्यांनी सांगितले. तसेच येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना भोईर यांच्याशी संपर्क साधला असता वाड्याच्या एस.टी बस मध्ये प्रवास करताना नेहमीच महिलांच्या आरक्षित जागेवर पुरूष बसलेले असतात. महिला उभ्या असतात अशा वेळी वाहकांनी महिलांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मधेच बसता येत नाही!
वाड्याचे वाहतूक नियंत्रक वसंत भोये यांच्याशी संपर्क साधला असता ज्या ठिकाणाहून बस सुटते त्या ठिकाणीच आरक्षित जागेवर महिला बसू शकतात. मधेच बसता येत नाही असा एस.टीचा नियम असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Men's Stance on Women's Reserved Ashes in ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.