शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

जुचंद्र अंगणवाडीला दिल्लीतील शिष्टमंडळाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 02:48 IST

पालघर जिल्ह्याअंतर्गत वसई तालुक्यातील, नायगाव (पुर्व) जुचंद्र अंगणवाडीस सोमवारी ग्राममंगल संस्था शिष्टमंडळ, दिल्ली यांनी सदिच्छ भेट दिली.

पारोळ : पालघर जिल्ह्याअंतर्गत वसई तालुक्यातील, नायगाव (पुर्व) जुचंद्र अंगणवाडीस सोमवारी ग्राममंगल संस्था शिष्टमंडळ, दिल्ली यांनी सदिच्छ भेट दिली. या शिष्टमंडळामध्ये प्रख्यात अणुशास्त्रज्ञ पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर यांचा प्रामुख्याने सहभाग होता.यासोबतच ग्राममंगल संस्था अध्यक्ष डॉ. हेमचंद्र प्रधान, शिक्षणतज्ञ रमेश पानसे, बालविकास अधिकारी मनीषा साळुंखे, सुपरवायझर योगिता डांगे, ग्राममंगल संचालक प्रवीण गुरव, ग्राममंगल सहयोगी निकिता काटले, जुचंद्र अंगणवाडी सेविका इंदुमती पाटील, वैशाली म्हात्रे, निर्मळा भोईर व छाया म्हात्रे आदींची उपस्थतीहोती.गेल्या अडीच वर्षांपासून ग्राममंगल संस्थेच्या माध्यमातून स्नेह प्रकल्प अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अंगणवाडयांमध्ये बालशिक्षणाचे काम सुरू असून ग्रामीण व खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना भेदभाव न करता शिक्षणाची समसमान संधी मिळावी, हा मुख्य उद्देश आहे.शिष्टमंडळाने जुचंद्र अंगणवाड्यांची सविस्तर पाहणी केली असता अंगणवाडी इमारत परिसर, अंतर्गत सजावट व विद्यार्थी खूप आवडले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले असता त्यांच्या अचूक तथा हजरजबाबी उत्तरांमुळे त्यांनी विद्यार्थी व अंगणवाडी सेविकांचे भरभरून कौतुक केले. भारतातील प्रख्यात अणूशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांनी अंगणवाडीना भेट देत बालशिक्षणाचे काम समजून घेतले. शिष्टमंडळाने इतर अनेक अंगणवाडीना भेट देत तेथील कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली. अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी प्रशिक्षण देणे, साधन साहित्य देणे, भेटी देऊन मदत करणे यासारखी कामे सुरू आहेत. आज बालशिक्षणाला घेऊन अंगणवाडी ताई, लहान मुले यांच्यात खूप बदल झाला असून आता अंगणवाडीत मुलं शिकती होत असल्याने अंगणवाडीत होणारे बालशिक्षण आणि इतर राबविण्यात येणारे उपक्र म बघण्यासाठी पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर यांनी सदिच्छ भेट दिली.डॉ. अनिल काकोडकर यांना जुचंद्रच्या रांगोळी कलेच्या ख्यातीबद्दल समजताच त्यांनी जुचंद्रच्या रांगोळीचे भरभरून कौतुक केले व जुचंद्रच्या रांगोळीकारांमार्फत स्वत:ची रांगोळी साकारण्याची इच्छा व्यक्त केली. माझी रांगोळी काढल्यानंतर मी स्वत: त्या रांगोळीचा फोटो फेसबुकवर शेअर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार