शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

बुलेट ट्रेन जमीन अधिग्रहणाची बैठक उधळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 05:34 IST

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहण करण्याबाबत पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाधितांना चर्चेला बोलावून त्यांच्या गावात छुप्या पद्धतीने पोलीस बंदोबस्तात मोजणी

हितेन नाईकपालघर : बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या जमिनी अधिग्रहण करण्याबाबत पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाधितांना चर्चेला बोलावून त्यांच्या गावात छुप्या पद्धतीने पोलीस बंदोबस्तात मोजणी करण्याचा डाव भूमिपुत्रांनी बुधवारी हाणून पाडला. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाºयांसमवेत सुरू असलेल्या बैठकीचा ताबा संतप्त महिलांनी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले.मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, वसई आणि तलासरी या चार तालुक्यांतील ८० गावांमधील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने हाती घेतला आहे.यासाठी बाधित लोक आणि त्यांच्या अधिकारासाठी लढणाºया संघटनांची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, मुख्य परियोजना प्रबंधक यू.पी. सिंह, जनरल मॅनेजर पंकज उके, उपवनसंरक्षक नानासाहेब लडकत, उपजिल्हाधिकारी पांडुरंग मकदूम आदी अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकाºयांनी सभागृहात प्रवेश करताच बुलेट ट्रेनच्या विरोधात घोषणाबाजी केली. आयोजकांनी बसण्यासाठी खुर्च्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली. मात्र, खुर्च्यांची व्यवस्था न झाल्याने उपस्थितांनी घोषणाबाजी सुरू केल्याने जिल्हाधिकाºयांनी सरळ उठून जमिनीवर बैठक मारली. या वेळी सदर बैठक ही कायदेशीर नसल्याचे सांगून रद्द करण्याची मागणी केली.केंद्र व राज्य शासनापर्यंत तुमची मते कळविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, याकामी नियुक्त केलेल्या एजन्सीच्या सांगण्यावरून या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकाºयाने सांगितले. जपानच्या जिका या खासगी कंपनीच्या कामासाठी जिल्हाधिकारी आणि त्यांच्या प्रशासनाला जुंपणे पूर्णत: बेकायदेशीर असल्याचा आरोप जनआंदोलन समितीचे शशी सोनवणे यांनी केला. या बैठकीच्या व्यवस्थेबाबत मी संतुष्ट नसल्याचे कारण देत शेवटी बैठक थांबवत असल्याचे जिल्हाधिकाºयांनी जाहीर केले. आपल्या दालनात बसलेल्या जिल्हाधिकाºयांनी बैठकीस्थानी येऊन छुप्या पद्धतीने जमीन अधिग्रहणाचे काम बंद करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी उपस्थितांनी खूप वेळ लावून धरली. मात्र, तुम्ही शिष्टमंडळासह माझ्या दालनात चर्चेला या, असा निरोप जिल्हाधिकारी यांच्याकडून येताच संतप्त महिलांनी त्यांच्या दालनाकडे धाव घेतली. या वेळी त्यांना अटकाव करणाºया पोलिसाशी महिलांची बाचाबाची झाली.कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमच्या जमिनी बुलेट ट्रेन आदी कोणत्याही प्रकल्पाला द्यायच्या नसून जमीन अधिग्रहणाचा प्रयत्न झाल्यास निर्माण होणाºया घटनेस संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा संतप्त महिलांनी दिला. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.