उघड्यावरील मांसविक्री थांबली
By Admin | Updated: May 5, 2017 05:33 IST2017-05-05T05:33:22+5:302017-05-05T05:33:22+5:30
वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील उघड्यावर होणारी मांस विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश महापालिकेने दिले असून जो

उघड्यावरील मांसविक्री थांबली
पारोळ : वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील उघड्यावर होणारी मांस विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश महापालिकेने दिले असून जो कोणी ते मोडेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याच्या लेखी नोटीसा अशा दुकानांना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे बंदिस्त दुकानातूनच मांस विक्री करता येणार आहे.
शहरातील उघड्यावर होणारी मांस विक्र ी आणि त्यामुळे होणाऱ्या अस्वच्छतेची दखल महापौर कार्यालयाने घेतली असून त्याबाबत योग्य कारवाईचे आदेश वसई विरार महापालिकेस दिले आहेत. शहरात जेथे कोठे असेल अवैध कत्तलखाने असतील तर ते त्वरित बंद करा, मटणाची दुकाने रस्त्यावर उघाडे दिसता कामा नये, दिसल्यास तुम्ही दोषी ठराल, अशी आदेश वजा ताकीद महापौर प्रविणा ठाकूर यांनी आरोग्य विभागाला दिली आहे.
वसई तालुक्यात कत्तलखाने नाहीत मात्र जागोजागी मटणाची दुकाने आहेत. ही दुकाने उघड्यावर असल्याने तेथून ये-जा करणाऱ्या नागरीकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच कापलेले मटण उघड्यावर टांगून ठेवण्यात येत असल्याने या मटणावर माशा बसतात, रस्त्यावरची धूळ बसते आणि तसेच त्याची विक्री होते. त्यातून परिसरात अस्वच्छताही निर्माण होते. म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.
१५ दिवसांत दुकाने बंदिस्त करा!
वसई तालुक्यातील या प्रकाराची तक्र ार अलीकडेच महापौर कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन महापौरांनी सक्त निर्देश दिले आहेत. आरोग्य विभागाने या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली आहेत. १५ दिवसात दुकाने बंदिस्त करावीत तसेच अनिधकृत दुकाने अधिकृत करुन घ्यावित अशा सूचना पाठविल्या असल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी सुखदेव दरवेशी यांनी लोकमतला सांगितले.