आगरदांडा : मुरुड - राजपुरी ग्रामपंचायतीतील ग्रामसभेत विनाकारण वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हरिदास बाणकोटकर यांच्यावर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.राजपुरी ग्रामपंचायतीची ग्रामसभा सुरु असताना विकासकामांची चर्चा सुुरु होती. याबाबत हरिदास बाणकोटकर यांनी विनाकारण घरकूल संबंधी विषय काढून दमदाटी व धमकी देवून शासकीय कामात अडथळा आणला, अशी तक्रार राजपुरी सरपंच हरिकणी रमेश गिदी यांनी मुरुड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे हरिदास बाणकोटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा मुरुड पोलीस निरीक्षक तुकाराम पेवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (वार्ताहर)
ग्रामसभेत वाद घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By admin | Updated: February 26, 2015 22:41 IST