शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

मासवणे, बावघरमधील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:42 PM

विविध भाजीपाल्यांचे उत्पादन : जि.प.च्या सेस फंडातून पाणी योजना, पूर्वी पावसाळ्यातच घेतले जायचे पीक

जनार्दन भेरे 

भातसानगर : केवळ पावसाळा वगळल्यास कधीही पाण्याखाली न येणारी जमीन पाण्याखाली आणून अनेक भाजीपाल्यांचे उत्पादन मासवणे व बावघर येथे घेतले जात आहे. यामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. शहापूर तालुक्यातील मासवणे व बावघर ही गावे मागासलेलीच आहेत. केवळ पावसाळ्यात एकमेव पीक घ्यायचे, त्याव्यतिरिक्त दुसरे पीक नाही वा व्यवसाय नाही. मात्र, गावाची एकी असेल तर काहीच अशक्य नाही. मग, एकच गाव नाही तर दोन गावांतील शेतकरी एकत्र आले आणि दोन किलोमीटर अंतरावरून वाहत असलेल्या काळू नदीच्या पाण्याचा वापर करायचे ठरले.

हे सगळे जुळून आले तरी पैशांचे सोंग काही आणता येत नाही. मग, या दोन्ही गावांतील २३ शेतकºयांनी एकत्र येऊन आपली कैफियत पंचायत समितीचे कृषी अधिकारी विलास झुंजारराव यांना सांगितली. यामध्ये एकनाथ तिवरे,गोविंद तिवरे, लहू मुकणे, लक्ष्मण मुकणे, मल्हारी तिवरे यांचा समावेश होता. विस्तार अधिकारी सचिन गंगावणे यांनी जोड देत या सर्वांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून एक योजना तयार करून या गावांसाठी ३६४ पीव्हीसी पाइप, साडेसात हॉर्सपॉवरची मोटार अशी दोन लाख रु पयांची योजना मंजूर करून घेतली. या गावातील शेतकºयांनी त्याचा फायदा घेऊन ही पाइपलाइन आपल्या गावात आणली. तुडुंब भरलेल्या काळू नदीच्या पाण्याचा योग्य वापर शेतकºयांनी करून आपल्या शेतीत अनेक प्रकारचा भाजीपाला घेण्यास सुरुवात केली. आज यामुळे शेतकºयांचे जीवनमान तर बदलले, मात्र पाणीटंचाईचा प्रश्नही सुटल्याचा आनंद ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.शिवाय, ३० ते ३५ हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आल्याने भाजीपाला, शेतीस उपयुक्त ठरत आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीचे उपसभापती पद्माकर वेखंडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश वीर, प्रकाश भांगरथ यांनी भेट दिली.या दोन गावांतील शेतकºयांना एकत्र करून सर्वांसाठी पाइप व मोटार मंजूर करून ही योजना उत्तम रीतीने पूर्णत्वास आणून गावांना त्याचा फायदा झाला, याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे. अशा आणखी दोन ते तीन योजना करण्याचा आमचा मानस आहे.- विलास झुंजारराव, कृषी अधिकारीआजपर्यंत पावसाळ्याच्या पाण्याव्यतिरिक्त पाणी नव्हते. मात्र, या योजनेमुळे आम्हाला आनंद तर झाला आहेच, पण आम्ही मोठ्या प्रमाणावर भाजीपालाही लावला आहे व उत्पादनही घेणे सुरू केले आहे. आम्ही नक्कीच या संधीचे सोने करू.- इंदूबाई वाळकू, शेतकरी