टेन-मनोर परिसरात मुसळधार पाऊस
By Admin | Updated: June 2, 2017 04:53 IST2017-06-02T04:53:03+5:302017-06-02T04:53:03+5:30
गुरूवारी संध्याकाळी टेन मनोर परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्या मध्ये बच्चे कंपनीने ओलेचिंब होऊन पावसाचा आनंद लुटला.

टेन-मनोर परिसरात मुसळधार पाऊस
अरिफ पटेल/लोकमत न्यूज नेटवर्क
मनोर : गुरूवारी संध्याकाळी टेन मनोर परिसरात मुसळधार पाऊस पडला. त्या मध्ये बच्चे कंपनीने ओलेचिंब होऊन पावसाचा आनंद लुटला. तर शेतकरी ही आनंदी होते. ते त्याची गेल्या दोनतीन दिवशा पासून आतुरतेने वाट पहात होते. संध्याकाळी पाच च्या सुमारास सर्वत्र काळोख पडला व मुसळधार पावसाला सुरवात झाली त्याचा आनंद घेण्यासाठी लहान मुले सरसावली. पाण्याच्या साचलेल्या डबक्यात त्यांनी सूर मारण्यास सुरवात केली. त्यांच्या अंगावर पडणाऱ्या पावसाच्या सरींचा आनंद घेत होते. पावसाच्या पाण्याच्या ओहोळात होड्या करून सोडणाऱ्यांचीही संख्या खूप मोठी होती. तर शेतकरीही आकाशाकडे बघून
‘पाऊस मोठा आला
चला आता शेतीला’
असे अत्यंत खुशीत म्हणत होते, गात होते.