शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

पालघरात मनसे आंदोलन, कार्यालयात कापला केक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:31 IST

नगर परिषदेच्या २० व्या वर्धापन दिनाचा सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासनाला विसर पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा नगर परिषद कार्यालयात केक कापून, फुलांचे गुच्छ भेट देऊन औपरोधिक निषेध केला.

पालघर : या नगर परिषदेच्या २० व्या वर्धापन दिनाचा सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासनाला विसर पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा नगर परिषद कार्यालयात केक कापून, फुलांचे गुच्छ भेट देऊन औपरोधिक निषेध केला.पालघर नगरपरिषदेची स्थापना १८ सप्टेंबर १९९८ रोजी झाल्याने मंगळवारी १८ सप्टेंबर रोजी २० वा वर्धापन दिन साजरा करणे अपेक्षित होते. सत्ताधारी असलेली शिवसेना, विरोधक असलेले राष्ट्रवादी, काँग्रेस आदींनी हा वर्धापन दिन साजरा करणे आवश्यक असतांना असा कुठलाही कार्यक्रम ठरविण्यात न आल्याने नगरपरिषदेचे प्रशासकीय प्रमुख मुख्याधिकारी आपल्या काही कर्मचाऱ्यांसह डहाणू येथे भाजप चे नगराध्यक्ष भरत राजपूत ह्यांच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. तर नगराध्यक्ष हे वर्धापनदिन साजरा न होण्याचे खापर प्रशासनावर फोडून मोकळे झाले होते. लोकमतने १९ सप्टेंबर च्या अंकात ह्या बाबत वृत्त प्रसिद्ध केल्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप व्यक्त करून मुख्याधिकाºयांच्या कार्यालयात केक कापून, मनसे मार्फत सन्मानपत्र देत अभिनव आंदोलन केले.नगरपरिषद स्थापने पासून शिवसेना तर कधी कॉंग्रेस - राष्ट्रवादी ची सत्ता नगरपरिषदेवर राहिली आहे. तर २०१४ पासून नगरपरिषदवर शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. मात्र गेल्या २० वर्षा पासून पालघर नगरपरिषद विकास कामांऐवजी भ्रष्टाचार, गैरव्यवहार यासाठी प्रसिद्ध राहिली आहे. आजवर नगरपरिषदेतील रस्त्याच्या कामांचे घोटाळे, कचरा-गटार सफाई घोटाळा, औषध फवारणीतील गैरव्यवहार अशी अनेक प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. नगरपरिषदेच्या विषयीचा राग मनात धुमसत असतांनाच तिच्या वर्धापनदिनाची आठवणही नगरपरिषदेला न राहिल्याने, शहरवासीयांच्या संतापात अधिकच भर पडली आहे.>ही असंवेदनशीलताढिम्म प्रशासन आणि असंवेदनशील नगरसेवक यांच्यामुळेच ही वेळ आल्याची प्रतिक्रिया मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी यावेळी व्यक्त केली. हे सर्व असंवेदनशील नगरसेवकामुळेच घडत असल्याचे सांगीत तालुकाध्यक्ष मंगेश घरत, सचिव दिनेश गवई,शहराध्यक्ष सुनील राऊत, गीता संखे,उदय माने,शैलेश हरमळकर, मिथुन चौधरी, रत्नदीप पाखरे, तुलसी जोशी, सौरभ संखे, नयन पाटील, तन्मय संख्ये, धनंजय झुंजारराव आदींनी नगरपरिषदे आंदोलन केले.