शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची आत्महत्या; सासरच्यांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 23:05 IST

शारिरीक छळ : पती, सासू, सासरा, नणंदा यांनी केले प्रवृत्त

नालासोपारा : वसई पूर्वेकडील मधुबन टाऊनशीपमधील उत्सव अ‍ॅव्हेन्यूमधील सदनिका नंबर १०४ मध्ये ९ जूनला संध्याकाळी नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मानसिक व शारीरिक छळ करून १० लाख रुपये आणि कार आणण्याचा सासरच्यांनी तगादा लावल्याने मुलीने आत्महत्या केली अशी तक्रार माहेरच्यांनी केली म्हणून मंगळवारी पोलिसांनी पती व तिच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे.

बिहार राज्यातील पाटणा येथे राहणाऱ्या रिना ऋषिकेश वर्मा (६२) यांची मुलगी जोतिबाला (२९) हीचे बिहारमधील विमल वर्मा याच्यासोबत काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्न झाल्यावर आईने १७ लाख रुपये रोख आणि १० लाखांचे सोन्याचांदीचे दागिने व घरगुती सामान दिले होते. जोतिबाला आपल्या सासरच्या मंडळीसोबत वसई पूर्वेकडील मधुबन टाऊनशीपमधील उत्सव अ‍ॅव्हेन्यूच्या सदनिका नंबर १०४ मध्ये राहत होती. गेल्या काही वर्षांपासून पती, सासू, सासरा आणि इतर माहेरच्या लोकांनी जोतिबाला १० लाख रुपये अणि कार माहेरून आणण्यासाठी तगादा लावला होता. जोतिबाला एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होती पण तिचा पगार सासरची मंडळी जबरदस्तीने घेत होते. आईकडून १० लाख रुपये आणणार नाही तोपर्यंत माहेरी जाऊ देणार नाही, असे बोलून त्रास रोज द्यायचे. ती गर्भवती राहिल्यावर सासरची मंडळीनी तिला मूल नको म्हणून धमकी देऊन मारहाण करायचे. पोलिसांनी नवरा विमल, सासू मीना , सासरा विजय , नणंद दीपा, तिचा नवरा अविनाश आणि नणंद सोनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.बहिणीच्या घरी घेतला गळफासत्रासाला कंटाळून जोतिबाला आपल्या बहिणीच्या घरी गेली व ९ जूनला संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आपल्या मुलीच्या मृत्यूला सासरचे मंडळी जवाबदार असल्याची तक्र ार वालीव पोलीस ठाण्यात रिना वर्मा यांनी दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याVasai Virarवसई विरार