पाली व सत्पाळ्यात अनेक जागा बिनविरोध

By Admin | Updated: October 22, 2015 00:06 IST2015-10-22T00:06:21+5:302015-10-22T00:06:21+5:30

वसई तालुक्यातील पाली आणि सत्पाळा या दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. १ नोव्हेंबर रोजी या ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहेत. सत्पाळा येथे

Many seats in Pali and Sappana uncontested | पाली व सत्पाळ्यात अनेक जागा बिनविरोध

पाली व सत्पाळ्यात अनेक जागा बिनविरोध

वसई : वसई तालुक्यातील पाली आणि सत्पाळा या दोन्ही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. १ नोव्हेंबर रोजी या ग्रा.पं.च्या निवडणुका होत आहेत. सत्पाळा येथे ११ जागांपैकी ९ जागा बिनविरोध झाल्या असून दोन जागांसाठी तर पाली येथे ७ जागांपैकी केवळ १ जागेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडी आणि वसई जनआंदोलन समिती हे दोनच पक्ष रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत बविआला या दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावा लागला होता. मनपातील गावांच्या प्रश्नावरून मतदारांनी बविआला नाकारले होते. या वेळी लोकांचा रोष कमी असल्याने बविआ दोन्ही ग्रा.पं.वर झेंडा फडकविण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
(अधिक वृत्त ३ वर)

Web Title: Many seats in Pali and Sappana uncontested