प्रेम प्रकरणातून पुरुषाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 00:25 IST2018-10-25T00:25:08+5:302018-10-25T00:25:11+5:30

नालासोपारा पूर्वेला गेल्या मंगळवारी झालेल्या खूनाचा पोलिसांनी उलगडा केला असून त्यामागचे कारण प्रेमप्रकरण हे होते.

 Man's murder in love affairs | प्रेम प्रकरणातून पुरुषाचा खून

प्रेम प्रकरणातून पुरुषाचा खून

विरार : नालासोपारा पूर्वेला गेल्या मंगळवारी झालेल्या खूनाचा पोलिसांनी उलगडा केला असून त्यामागचे कारण प्रेमप्रकरण हे होते. यात तीन आरोपी सहभागी आहेत असे पोलिसांनी सांगितले. ते त्यांचा शोध घेत आहे.
मयत व्यक्ती सुनील सहानी (३६) सदगुरू कृपा अपार्टमेंट, बिलालपाडा, नालासोपारा पूर्व येथील रहिवासी असून, बायको बिभा (३५) हिच्यासोबत राहतो. सुनील सहानी चे प्रेम संबध बायको विभाला सांगण्याचे पत्र देऊन त्याला घाबरवले गेले. हाच राग मनात धरून त्याने दिवाकर सिंग सोबत भांडण केले. असे नालासोपारा पोलिसांनी सांगिलते. ह्या सर्व भांडणाचा राग मनात धरून दिवाकर सिंग ने सुनील सहानी चा काटा काढण्यासाठी त्याला नालासोपारा तलावाकडे बोलवले थोड्यावेळाने तेथे दिवाकरचे काका व भाऊ आले. मारामारी सुरु झाली व सुनील व त्यांनी सुनीलचा खून केला.

Web Title:  Man's murder in love affairs