पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते मनोदय पुरस्कार
By धीरज परब | Updated: April 14, 2023 18:19 IST2023-04-14T18:19:10+5:302023-04-14T18:19:29+5:30
पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते मनोदय पुरस्काराचे वाटप करण्यात आले.

पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते मनोदय पुरस्कार
मीरारोड - विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राष्ट्ररत्न पुरस्कार पद्मश्री अनुप जलोटा यांच्या हस्ते देण्यात आला. मीरारोडच्या भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मनोदयच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचे विजय मोरे यांनी सांगितले.
अनुप जलोटा यांच्या हस्ते विज्ञान शिक्षक बापू निंबा चव्हाण, अभिनेता मनीष वाधवा, आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू वैभवी दवडे, गरबा गायक पार्थिव गोहील, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, टाकाऊ तुन टिकाऊ वैज्ञानिक प्रकल्प बनवणाऱ्या मीरा भाईंदर महानगरपालिका शाळा क्रमांक ४ चे विद्यार्थी आणी शिक्षक, धर्मवीर आनंद दिघे हृदय रोग उपचार केंद्र चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीत पॉल, व्होईस ऑफ इंडिया गायिका सिमरन चौधरी, पर्यावरण साठी कार्य करणारी गो ग्रीन फाउंडेशन यांना मनोदय राष्ट्ररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.