दोनशे रूपये दंड करा हो! आधी पिकदाण्या तर बसवा!

By Admin | Updated: February 5, 2017 02:17 IST2017-02-05T02:17:09+5:302017-02-05T02:17:09+5:30

पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या स्टेशन प्रबंंधकांना प्लॅटफॉर्मवर थुंकणाऱ्यास किमान तीन प्रवाशांकडून प्रत्येकी दोनशे प्रमाणे दररोज सहाशे रुपये वसूल

Make a penalty of two hundred rupees! Sit on first ribbon! | दोनशे रूपये दंड करा हो! आधी पिकदाण्या तर बसवा!

दोनशे रूपये दंड करा हो! आधी पिकदाण्या तर बसवा!

- हितेन नाईक,  पालघर

पश्चिम रेल्वेच्या प्रशासनाने प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या स्टेशन प्रबंंधकांना प्लॅटफॉर्मवर थुंकणाऱ्यास किमान तीन प्रवाशांकडून प्रत्येकी दोनशे प्रमाणे दररोज सहाशे रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिले आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवर प्रथम पिकदाणीची व्यवस्था करावी नंतरच दंड वसूल करावा असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
‘भारत स्वच्छता मिशन’ अंतर्गत पंतप्रधानांनी देशभर स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वच पातळी वरून तसेच प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबविण्याचे प्रयत्न केले जात
आहेत.
रेल्वेप्रशासनानेही स्टेशनवर थुंकणाऱ्या प्रवाश्यांकडून सक्तीने वसुली करण्याचे काम हाती घेतले आहे. डहाणू रोड स्टेशन पर्यंतच्या भागाला वर्ष १९९५ रोजी उपनगरीय सेवा क्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर आजही २२ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही प्रवाशांना आजही पुरेशा सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. आज दररोज २५ हजार प्रवाशी पालघर स्टेशनवरून प्रवास करीत असून त्यातुन प.रे.ला १ कोटी ५० लाखाचे मासिक उत्पन्न मिळत आहे. आजही या उपनगरीय क्षेत्रातील स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म वर अपुरी शेड, दुरावस्थेतील शौचालये, अपुरे पाणी, बंद इंडिकेटर्स आदि असुविधा आहेत.
एकीकडे उपनगरीय दर्जा घोषित करायचा व दुसरीकडे सोयीसुविधा पुरविण्याबाबत उदासीनता दाखवून उलट प्रवाशांकडूनच उपनगरीय कर बेकायदेशिररित्या वसूल करायचा, पिकदाणीसारख्या सुविधा उपलब्ध करून न देता थुंकणाऱ्यांकडून कर दंड वसूल करायचा ही सुलतानी असल्याची प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत.

प्रवाशांचा खडा सवाल
रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्टेशन वर थुंकणाऱ्या प्रवाशांकडून प्रत्येकी २०० रूपये दंड वसूल करण्याचे आदेश स्टेशन प्रबंधकांना दिले आहेत. दररोज कमीतकमी तीन प्रवाशांकडून ६०० रु पये जमा करावे असे आदेश दिले असले तरी स्टेशनवर थुंकण्यासाठी रेल्वे ने पिकदाणी ची व्यवस्थाच केली नसतांना प्रवाशांनी थुकावे कुठे? असाही प्रश्न संतोष चुरी,अभय दारु वाले ह्या प्रवाशांकडून उपस्थित केला गेला आहे. त्याचे कोणते उत्तर रेल्वेकडे आहे?

पालघर स्टेशनवर थुंकणारे बहुतांशी प्रवासी असतात त्यांच्याकडून दंड वसूल करणे खूप कठीण होते. याचा विचार प्रशासनाने करावा
- सी एच कोहली, स्टेशन प्रबंधक,
पालघर.

Web Title: Make a penalty of two hundred rupees! Sit on first ribbon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.