शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ठोकशाही मोडून लोकशाही आणण्यासाठी काँग्रेसला विजयी करा- अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 16:17 IST

विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील ठोकशाही मोडीत काढून लोकशाही आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं जनता दल सेक्युलर व मित्रपक्षांचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.

वसई- विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील ठोकशाही मोडीत काढून लोकशाही आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं जनता दल सेक्युलर व मित्रपक्षांचे उमेदवार दामोदर शिंगडा यांना विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले. पालघर लोकसभा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, जनता दल सेक्युलर आघाडीचे उमेदवार दामोदर शिंगडा यांच्या प्रचारार्थ पारोळा व वसई येथील प्रचार सभांना मार्गदर्शन करताना खा. चव्हाण म्हणाले की, राज्यातल्या व केंद्रातल्या सरकारने गेल्या चार वर्षात वसई, विरार, पालघरच्या विकासासाठी केलेले एक काम दाखवावे व नंतर मते मागावीत.काँग्रेस सरकारने पालघर जिल्ह्याची निर्मिती केली. भाजप शिवसेनेची सत्ता आल्यापासून पालघर जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे. भाजप, शिवसेनेला पालघर जिल्ह्याचा विकास नाही तर पालघर जिल्ह्यातील जमिनी हव्या आहेत म्हणूनच मुख्यमंत्र्यांसह शिवसेना, भाजपचे मंत्री व नेते पालघर जिल्ह्यात फिरून जमिनी शोधत आहेत असा घणाघाती आरोप करून या निवडणुकीत शिट्टी ही चालणार नाही आणि दमदाटीही चालणार नाही असा टोला खा. चव्हाण यांनी लगावला.  वसई, विरार, पालघरच्या लोकांना कामासाठी रोज मुंबईला जावे लागते, अहमदाबादला नाही. त्यामुळे त्यांना बुलेट ट्रेनची नाही तर लोकल ट्रेनची गरज आहे. भाजप सरकारला लोकल ट्रेन नीट चालवता येत नाही आणि बुलेट ट्रेनच्या गप्पा मारत आहेत. अगोदर लोकल ट्रेन नीट चालवा असा टोला लगावत आपण दोघे भाऊ मिळून खाऊ अशा पध्दतीने शिवसेना, भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र बसून सत्तेचा लाभ घेत आहेत. शिवसेना सरकारच्या धोरणाशी सहमत नसेल तर मग सत्तेत का आहे? शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्यानेच भाजपासोबत पापाची वाटेकरी झाली आहे. वसई, विरारवासियांनो कोणाच्या दहशतीला घाबरू नका राज्यात आणि देशात परिवर्तन अटळ आहे. काँग्रेसचेच सरकार येणार आहे. आम्ही ठोकशाहीचा बिमोड करु त्यामुळे निर्भय होऊन पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, जनता दल सेक्युलर व मित्रपक्षांचे उमेदवार दामू शिंगडा यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी नागरिकांना केले.यावेळी ज्येष्ठ नेते विकास वर्तक,वसई शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉमणिक डिमेलो, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस यशवंत हाप्पे, राजन भोसले, राजेश शर्मा, पृथ्वीराज साठे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हरिष रोग्ये, प्रदेश काँग्रेसचे सचिव विजय पाटील, राजेश घोलप, पुष्कराज वर्तक यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणpalgharपालघरPalghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018