शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

Vidhan sabha 2019 : बोईसरमध्ये महायुतीचा उमेदवार अडचणीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 00:17 IST

बोईसर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेला सोडण्याच्या भाजपच्या निर्णयाविरोधात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी बंडाचे निशाण फडकवित गुरुवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले. मात्र...

- हितेन नाईक/आरिफ पटेलपालघर/मनोर : बोईसर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेला सोडण्याच्या भाजपच्या निर्णयाविरोधात भाजपचे जिल्हा सरचिटणीस संतोष जनाठे यांनी बंडाचे निशाण फडकवित गुरुवारी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले. मात्र, पक्षाच्या विरोधात हा लढा नसून पाच वर्षांच्या निष्क्रियतेच्या विरोधातला माझा हा लढा असल्याचे सांगितल्याने युतीच्या गोटात खळबळ उडाली आहे.पालघर जिल्ह्यात एक खासदार, दोन आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी भाजपची मोठी राजकीय ताकद असताना भाजपच्या वरिष्ठांनी सहा विधानसभांपैकी पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई अशा चार जागा शिवसेनेला बहाल केल्याने उपस्थित भाजप व सहकारी संघटनांनी आपली नाराजी व्यक्त केली. पक्षाचा हा निर्णय योग्य नसल्याचे सांगत पक्षाने आपल्यावर अन्याय केल्याची भावना व्यक्त करतानाच आपला राग हा पंतप्रधान अथवा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नसल्याचेही जनाठे यांनी स्पष्ट केले.गेल्या पाच वर्षात निष्क्रिय आमदार ठरलेल्या आ. विलास तरे यांना बविआमधून उमेदवारी मिळत नसल्याची चाहूल लागल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. अशा निष्क्रिय आमदाराला उमेदवारी देण्यात आल्याने संतोष जनाठे यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. बुधवारी मनोर येथे आयोजित बैठकीला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पालघर नगरपरिषदेच्या भाजपच्या आरोग्य सभापती लक्ष्मीदेवी हजारी, तालुकाध्यक्ष प्रमोद आरेकर, शहर अध्यक्ष तेज हजारी, पंचायत समिती सदस्य रंजना संखे यांच्यासह बोईसर विधानसभा मतदार संघातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. या दरम्यान विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वनवासी एकता मित्र मंडळ, कातकरी महासंघ आदींनी आपला पाठिंबा जनाठेंना दर्शविला.जिल्हा शिवसेनेला बहाल केल्याचे आणि बोईसर विधानसभा भाजपऐवजी सेनेला देण्याच्या निर्णयाचे मोठे पडसाद मनोरच्या बैठकीत उमटले. आमचा लढा हा निष्क्रियतेच्या विरोधातला असून आतापर्यंत ज्या विचारासाठी लढलो त्या विचारांना वाचविण्यासाठी आपण ही लढाई लढत असल्याचे जनाठे यांनी पत्रकारांना सांगितले. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात राहून १५ वर्षे संघटक प्रचारक, पाच वर्षे भाजप पक्षाच्या बळकटीकरणला हातभार लावला. आम्ही बंडखोरी केली नसून पक्षाच्या विरोधातही काम करणार नाही, तर जिंकून आल्यावर पक्षालाच पाठिंबा देणार असल्याचे ते म्हणाले.निष्ठावंतांच्या नाराजीतून बंडखोरी?भाजप - शिवसेना पक्षात झालेल्या पक्षांतरामुळे निष्ठावानांच्या नाराजीतून बंडखोरीच्या घटना घडत आहेत. जनाठे नंतर विक्रमगड विधानसभा मतदार संघातून पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याविरोधात थोड्या मताने पराभूत झालेले विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनीही जिल्हा परिषद गटनेता आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सेनेचे जगदीश धोडी, विद्यमान आमदार अमित घोडा आदींसह अनेक पदाधिकारी नाराज असून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी मतदानापूर्वी काही झटके शिवसेनेला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019boisar-acबोईसरShiv SenaशिवसेनाBJPभाजपा