शेतकरी निवास बनले पं.स.चे गोदाम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थोपटले विरोधात दंड : सभापती म्हणतात करणार खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 02:53 IST2017-09-08T02:53:01+5:302017-09-08T02:53:09+5:30
तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाºया शेतक-यांना थांबण्यासाठी वाडा येथे १९८५-८६ साली ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर शेतकरी निवासस्थानाची इमारत बांधण्यात आली होती.

शेतकरी निवास बनले पं.स.चे गोदाम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थोपटले विरोधात दंड : सभापती म्हणतात करणार खुले
वाडा : तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त येणाºया शेतक-यांना थांबण्यासाठी वाडा येथे १९८५-८६ साली ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या समोर शेतकरी निवासस्थानाची इमारत बांधण्यात आली होती. मात्र सध्या त्याची अवस्था पंचायत समितीची वखार अशी झाली आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक शेतकरी कामानिमित्त वाडा येथे येत असतात. त्यांच्यासाठी १९८५-८६ साली रत्नाकर पाटील हे सभापती असताना शेतकरी निवास्थान बांधण्यात आले होते. मात्र आजच्या घडीला ह्या निवास्थानाकडे प्रशासनाचे तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने तिचे दरवाजे, खिडक्या खिळखिळे झाले आहेत. पंचायत समितीच्या कृषी विभागाचे अनुदानीत कृषीसाहित्य ठेवण्यासाठी तिचा उपयोग करण्यात येत आहे.
या इमारतीमधे असलेले कृषी विभागाचे साहित्य काढून तिची डागडुजी करून ती शेतकºयांच्या निवास्थानासाठी खुली करावी अशी मागणी शेतकºयांकडून तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे.