चिकणघर : कल्याणजवळील गौरीपाडा येथील हरिश्चंद्र म्हात्रे या शेतक-याने पैजेमध्ये स्वत:चा बैल गमावल्याची घटना नुकतीच घडली. म्हात्रे यांच्या गावात नंदीबैल घेऊन दोन माणसे माधुकरीसाठी आली होती. त्या वेळी तुमचा बैल शांत कसा, माझ्या बैलाला नंदीबैलसारखे शांत करू शकता का, असा सवाल म्हात्रे यांनी केला. यावर नंदीबैलवाल्याने होकार देताच माझा बैल जेथे चरतो आहे, तेथून त्याला धरून आणल्यास बैल तुम्ही घ्यायचा आणि नाही आणल्यास तुमचा नंदीबैल मला द्यायचा, अशी पैज गावकऱ्यांच्या साक्षीने म्हात्रे आणि नंदीबैलवाल्यात लागली. नंदीबैलवाल्याने शेतकऱ्याचा बैल जेथे चरत होता तेथून त्याला गावात आणले. पैज जिंकली व बैल घेऊन गेला. विशेष म्हणजे म्हात्रे यांचा बैल मारका होता़ तो कुणालाच हात लावू देत नसे. (वार्ताहर)
पैजेत गमावला बैल
By admin | Updated: February 2, 2015 02:58 IST