जव्हारला लांबलचक रांगा, मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी
By Admin | Updated: November 11, 2016 02:50 IST2016-11-11T02:50:31+5:302016-11-11T02:50:31+5:30
आपल्याकडे हजार व पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांत प्रचंड गर्दी उसळली होती. ठेवीदारांनी आपली वहाने जागा मिळेल तेथे रस्त्यावरच पार्क केल्याने

जव्हारला लांबलचक रांगा, मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी
जव्हार : आपल्याकडे हजार व पाचशेच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांत प्रचंड गर्दी उसळली होती. ठेवीदारांनी आपली वहाने जागा मिळेल तेथे रस्त्यावरच पार्क केल्याने त्यातून वाहतूकोंडी निर्माण झाली. बँकांतून बदलून दिल्या जाणाऱ्या ४००० रुपयांत २००० ची एक व १०, १० च्या दोन हजाराच्या नोटा दिल्या जात असल्याने आता परत या २०००चे सुटे करायचे कसे आणि कुठे असा प्रश्न सामान्यांना पडला होता. महावितरण विभागाला आजही १००० व ५०० च्या जुन्या नोटा घेण्याचे आदेश असल्यामुळे त्यांनी जव्हार शहरभरात व खेडोपाड्यात वीजबिल भरण्यासाठी ५०० व १००० च्या जुन्या नोटा स्वीकारल्या जातील अशी दवंडी दिली. आज जव्हारकरांनी सगळी कामे बाजूला ठेऊन फक्त नोटा बदलून घेणे या एकाच कामासाठी आपला दिवस खर्च केला. जव्हार तालुका हा १०० टक्के आदिवासी तालुका असल्यामुळे स्टेट बॅँक आॅफ इंडिया, जव्हार शाखेत तर आदिवासी ग्राहकांचा लोंढाच्या लोंढा सैरावैरा करतांना दिसत आहे. तर व्यापरी वर्ग आप आपले देणे घेणे व इतर पैशाचा लेखाजोखा आपल्या सीएला विचारूनच करीत आहेत. व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील जुन्या नोटांचा भरणा करंट खात्यात दोन दिवसांतच करता येऊ शकणार आहे, त्यामुळे व्यापरी आजही द्विधेत सापडला आहे, गुप्तधनाचा पर्दाफाश होणार असल्यामुळे महिला चिंतेत आहेत. (वार्ताहर)