‘लोकमत’च्या वार्ताहर सासवडे यांना पुरस्कार

By Admin | Updated: January 6, 2017 05:59 IST2017-01-06T05:59:35+5:302017-01-06T05:59:35+5:30

येथील आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघरच्यावतीने दिला जाणारा ‘राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार’ लोकमतच्या सफाळे येथील वार्ताहर शुभदा सासवडे यांना प्रदान करण्यात आला.

'Lokmat' winner Saaswade gets the award | ‘लोकमत’च्या वार्ताहर सासवडे यांना पुरस्कार

‘लोकमत’च्या वार्ताहर सासवडे यांना पुरस्कार

नंडोरे (ता. पालघर) : येथील आदर्श शैक्षणिक व सामाजिक संस्था पालघरच्यावतीने दिला जाणारा ‘राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार’ लोकमतच्या सफाळे येथील वार्ताहर शुभदा सासवडे यांना प्रदान करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सफाळे येथील वेढी मराठी शाळा येथे मंगळवारी या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
त्यांनी पत्रकार म्हणून सामाजिक क्षेत्रात केलेल्या निस्वार्थ सेवेच्या उल्लेखनीय कामिगरीबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी सामाजिक क्षेत्रात कामिगरी करणाऱ्या इतरांनाही पुरस्कार वितरित करण्यात आले. त्याच बरोबरीने खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी खादी ग्रामोद्योग मुंबई आयोगाचे अधिकारी वाय. के. बारामतीकर, क्षमता निर्माण निर्देशक एम. बी. कांबळे, उपनिर्देशक तथा प्राचार्य लाडे तर संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कुराडे, महिला बचत गट, परिसरातील समाजसेवी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 'Lokmat' winner Saaswade gets the award