शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

‘शिट्टी’ मिळू नये म्हणून पालघरात रात्रभर लॉबिंग; चिन्हच गोठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:19 AM

अर्ज छाननी उशिरापर्यंत रेंगाळली : चेतन पाटील यांच्या माघारीनंतर शिवसैनिकांची गर्दी

पालघर : गुरु वारी झालेल्या छाननी दरम्यान बहुजन महापार्टीच्या चेतन पाटील यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर शुक्रवारी त्यांनी आपली उमेदवारी माघार घेतल्याने बविआ ला शिट्टी चिन्ह मिळू नये यासाठी सेना-भाजप च्या वरीष्ठासह शेकडो शिवसैनिकांची मोठी गर्दी जिल्हाधिकारी कार्यालया समोर केली होती. शह-काटशहाच्या या लढ्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दालनात रात्री उशिरा पर्यंत युक्तिवाद सुरु होता. दरम्यान, बहुजन विकास आघाडी ची शिट्टी चिन्हांची मागणी अमान्य करीत शिटी चिन्ह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोठवून ठेवीत रिक्षा हे चिन्ह दिले आहे.

शुक्रवारी अर्ज छाननी दरम्यान चेतन जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असल्याने शिवसेनेची मोठी गर्दी जमली होती. त्यासाठी त्यांनी मागितलेल्या पोलीस सरंक्षणाबाबत न्यायालयाने हे प्रकरण आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याची भूमिका घेतली. त्यातवर त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांना लेखी पत्र देऊन त्याचे अधिकार आपल्या प्रतिनिधीला (सूचक) दिले होते. मात्र, त्यांनी प्रत्यक्षात उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे लागेल असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगून चेतन याला पोलीस बंदोबस्तात आणण्याचे आदेश दिले. बहुजन महापार्टीचे उमेदवार राजू लडे आणि चेतन पाटील या दोन उमेदवारांना बहुजन महापार्टी ने ए बी फॉर्म दिले होते. ३ एप्रिल रोजी राजू लढे यांनी एबी फॉर्म जोडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होत. मात्र त्यानंतर चेतन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बहुजन महापार्टीचा एबी फॉर्म भरत लडे हे बहुजन पार्टीचे अधिकृत उमेदवार नाहीत असे नमूद केले. त्यामूळे गुरु वारी झालेल्या उमेदवारी अर्जाच्या छाननी दरम्यान राजू लडे हे अपक्ष व चेतन पाटील हे बहुजन महापर्टीचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आले होते.

बविआ पक्षाकडून उच्च न्यायालयात आपल्या उमेदवाराला शिट्टी हे चिन्ह मिळण्याबाबत याचिका दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्याना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयाकडे जाण्याच्या सुचना केल्या. त्या अनुषंगाने त्यानी या पूर्वी आमचे उमेदवार बळीराम जाधव हे २००९ च्या निवडणुकीत शिट्टी या चिन्हावर निवडून आल्याने हे आपल्यालाच मिळावे असा दावा केला. तर दुसरी कडे छाननी दरम्यान उरलेल्या पक्षातील उमेदवारा मध्ये आमचा बविआ पक्ष हा निवडणूक निर्णय अधिकाºया कडे नोंदणीकृत असल्याने शिट्टी हे चिन्ह आम्हालाच मिळावे असा दुहेरी दावा बविआ कडून करण्यात आला आहे.

या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे रात्री ७.३० वाजता सुनावणी ठेवण्यात आली होती.  12.30 नंतर रात्उरी शिरा पर्यंत त्यावर दोन्ही पक्षकारांच्या बाजूने युक्तिवाद सुरू होते. अखेर शिट्टी हे चिन्हच गोठविण्यात आले.

एबी फॉर्ममध्ये खाडाखोड केल्याने गुन्हामहापार्टी कडून अपक्ष ठरलेले उमेदवार राजू लडे हे आदिवासी उमेदवार असल्याने ते माझ्याकडे न्याय मागण्यासाठी आले असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र बहुजन विकास आघाडीकडून शिट्टी हे चिन्ह हिसकावून घेण्याची चांगली संधी असल्याने सेनेने या प्रकरणात उडी घेतली होती.बहुजन महापार्टी चे उमेदवार चेतन पाटील यांनी पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराने पक्षाने दिलेल्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड केल्या प्रकरणी सातपाटी सागरी पोलीस स्थानकात भादवी कलम ४२० अन्वये गुन्हा नोंद केला होता. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकाºयां समोर आपले म्हणान माबडून तो बाहेर आल्या नंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

 

टॅग्स :palghar-pcपालघर