शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

चला, शिक्षण घेऊ या पुढे जाऊ या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:26 AM

तारा संस्थेचा उपक्रम

हुसेन मेमन जव्हार :    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले ७ ते ८ महिने शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. शिक्षणासाठी ऑनलाइन पद्धत वापरली जात असली तरी विविध कारणास्तव त्याचा ग्रामीण भागात फारसा उपयोग होत नाही. हाच विचार करून ‘तारा आदिवासी सामाजिक संस्था’ यांच्या वतीने संस्थापक प्रदीप कामडी व प्रशांत कामडी हे सहकाऱ्यांसमवेत दररोज दोन तास मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत आणि आदिवासी पाड्यांवरील मुलेही त्याचा आनंद घेत आहेत.

जव्हारसारख्या अतिदुर्गम भागात फेब्रुवारीपासून आश्रमशाळा बंद झाल्यामुळे विद्यार्थी घरी परतले. त्यानंतर ऑनलाइन शिक्षणाला सुरुवात झाली. परंतु स्मार्टफोन, इंटरनेट नेटवर्क आणि विद्युत पुरवठा या सगळ्यामुळे ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग थोडा यशस्वी झाला. यामुळेच स्थानिक युवकांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत पुढाकार घेत विविध उपक्रम सुरू केले. ग्रामीण आदिवासी मुलांच्या अभ्यासात कोणताही खंड पडू नये, लहान मुलांमध्ये शिक्षणाची गोडी टिकून राहावी, शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने पिंपळशेत कोतीमाळ या आदिवासी पाड्यावर शाळा चालू होईपर्यंत मुलांना रोज दोन तास शिक्षणाचे धडे दिले जातात.

शिक्षण हा मुलांच्या विकासाचा पाया आहे. मुलांना नियमित शिक्षण न मिळाल्यास त्यांची शिक्षणाबाबतची आवड कमी होते. यासाठी मी तारा आदिवासी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मित्रांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे.    - प्रदीप कामडी, संस्थापक अध्यक्ष, तारा आदिवासी सामाजिक संस्था

टॅग्स :Vasai Virarवसई विरार