चिमुरडीची कळव्यातून सुखरुप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:09 IST2018-01-19T00:09:54+5:302018-01-19T00:09:56+5:30
नालासोपारा शहरातून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षाच्या मुलाची पोलिसांनी सुखरुप सुटका करून तिला पालकांच्या हवाली केले

चिमुरडीची कळव्यातून सुखरुप सुटका
वसई : नालासोपारा शहरातून अपहरण करण्यात आलेल्या चार वर्षाच्या मुलाची पोलिसांनी सुखरुप सुटका करून तिला पालकांच्या हवाली केले. अपहरणकर्ता मात्र पोलिसांच्या तावडीतून निसटला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन येथील रशीद कंपाऊंड येथील वशीमा नसीम शा या चार वर्षाच्या मुलीचे आलावू वकील शाने १५ जानेवारीला अपहरण केले होते. शा वशीमाच्या आईच्या बहिणीचा जावई आहे. पूर्ववैमनस्यातून त्याने वाशीमला १५ जानेवारीला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ती घराबाहेर खेळत असतांना खाऊ देण्याच्या बहाण्याने पळवून नेले होते.
तिची सुटका करण्यासाठी तुळींज पोलिसांनी दहा पथके तयार केली होती. पोलिसांनी कळवा येथून तिला सुखरुप ताब्यात घेऊन तिच्या पालकांच्या हवाली केले. अपहरणकर्ता मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटून गेला. त्याचा शोध जारी आहे.