शैक्षणिक साहित्याचा वापर न करता विद्यार्थ्यांना दिले धडे !

By Admin | Updated: November 13, 2016 00:17 IST2016-11-13T00:17:42+5:302016-11-13T00:17:42+5:30

सर्व शिक्षक आणि विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीचा आनंद उपभोगत असताना विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बास्ते शाळेतील उल्हास शेवाळे यांनी ३ ते ९ नोव्हेंबर

Lessons given to students without using educational material! | शैक्षणिक साहित्याचा वापर न करता विद्यार्थ्यांना दिले धडे !

शैक्षणिक साहित्याचा वापर न करता विद्यार्थ्यांना दिले धडे !

- वसंत भोईर, वाडा

सर्व शिक्षक आणि विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीचा आनंद उपभोगत असताना विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बास्ते शाळेतील उल्हास शेवाळे यांनी ३ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते ५ य वेळेत शिबीराचे आयोजन करून अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थांच्या प्रगतीसाठी शैक्षणिक साहित्याचा वापर न करता विद्यार्थांना शिक्षणाचे धडे दिले. या अनोख्या उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक केले जात आहे.
विद्यार्थ्यांनी दप्तर न आणता शैक्षणिक साहित्याचा वापर करून आनंददायी पध्दतीने शिक्षण घेतले. विशेष म्हणजे या शिक्षकाने स्वत: खर्च करून ५० पेक्षा जास्त शैक्षणिक साहित्य तयार केले. या शैक्षणिक शिबीरात रोज वाचन, लेखन, श्रुतलेखन, गोष्टी, गाणी, संवाद, कविता तयार करणे, गोष्ट तयार करणे, पत्र लेखन , चित्रवर्णन, खेळ, जोडशब्द इत्यादी कार्यक्र म घेतले.
विक्रमगड पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी बी.व्ही.मोकाशी यांनी या शिबीराला भेट देऊन विद्यार्थाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. शिक्षक उल्हास शेवाळे व विद्यार्थांचे कौतुक केले. तालुक्यातील सर्व शिक्षकांनी असे कार्यक्र म घेतले तर विद्यार्थ्यांची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही असा शेरा देऊन शुभेच्छा दिल्या.

Web Title: Lessons given to students without using educational material!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.