शहरं
Join us  
Trending Stories
1
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
2
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
3
शनी देव कोपला? भव्य कडे अचानक दिसेनासे झाले; काय आहे दुर्मीळ खगोलीय घटनेमागील रहस्य?
4
इथे २०२५ नाही, २०१८ आहे, सूर्योदय १२ वाजता होतो; ज्वालामुखीची राख याच देशातून भारतात आली
5
स्त्रियांसाठी स्वतःचेच घर बनलेय सर्वात धोकादायक ठिकाण! प्रत्येक १० मिनिटाला महिलेची जवळच्याच माणसाकडून झाली हत्या
6
Priyanka Chaturvedi: भाजलेल्या चण्यांमध्ये 'कर्करोगजन्य' विषारी केमिकल? प्रियंका चतुर्वेदींचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र!
7
आयटी इंजिनिअर नोकरी गमावली, होम लोनचा हप्ता भरण्यासाठी थेट रॅपिडो ड्रायव्हर बनला!
8
गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'भारत NCAP 2.0' नियम लवकरच लागू; 'क्रॅश टेस्ट' आता कठीण...
9
'जुबिन गर्ग यांची हत्या झाली!'; आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सिंगापूर मृत्यू प्रकरणावर धक्कादायक दावा
10
GST नंतर आता कर्जही होणार स्वस्त? RBI लवकरच रेपो दरात कपात करण्याची शक्यता; गव्हर्नर म्हणाले..
11
“सत्ताधाऱ्यांची विधाने म्हणजे सत्तेची गुर्मी, निवडणूक आयोग कारवाई का करत नाही?”: वडेट्टीवार
12
IND vs SA 2nd Test : द.आफ्रिकेनं ठेवलं अशक्यप्राय लक्ष्य! टीम इंडियासमोर सामना वाचवण्याचं आव्हान
13
“मार्च २०२६ पासून मीरा–भाईंदरला पूर्ण क्षमतेने सूर्या योजनेचा जल पुरवठा सुरू होणार”: सरनाईक
14
धक्कादायक! 'गुप्त रोग' बरे करण्याच्या नावाखाली भोंदू बाबाने ४८ लाखांना फसवलं; इंजिनीअरची किडनीही फेल 
15
हाय-डिमांड नोकऱ्यांची लिस्ट आऊट! या २५ फील्डमध्ये पडणार पगाराचा जोरदार पाऊस!
16
महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
17
सेलिना जेटलीचा पतीवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप, ५० कोटींसह मागितला घटस्फोट
18
"हा केवळ ध्वज नाही तर,..." राम मंदिराच्या शिखरावर भगवा फडकावल्यानंतर PM Modi म्हणाले...
19
"सरकार कोणाचेही असो, मानसन्मान पाळायलाच पाहिजे"; सुप्रिया सुळेंची CM-DCM वर टीका
20
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र सप्ताह कधीपासून सुरू करावा? पाहा, मान्यता, महत्त्वाच्या गोष्टी
Daily Top 2Weekly Top 5

शेकोटीसाठी आलेल्या मुलावर बिबट्याची झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 09:48 IST

Leopard Attack News: गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना मोखाडा तालुक्यात घडत आहेत. अशात सोमवारी सकाळी खोच ग्रामपंचायत हद्दीत सकाळी शेकोटी पेटवण्यासाठी नऊ वर्षांचा मुलगा घराच्या कोपऱ्यात येऊन बसताच बिबट्याने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.

मोखाडा - गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना मोखाडा तालुक्यात घडत आहेत. अशात सोमवारी सकाळी खोच ग्रामपंचायत हद्दीत सकाळी शेकोटी पेटवण्यासाठी नऊ वर्षांचा मुलगा घराच्या कोपऱ्यात येऊन बसताच बिबट्याने त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाच्या कुटुंबीयांनी आरडाओरड करताच बिबट्याने पळ काढला अन् चिमुरड्याचा जीव वाचला.  मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पिंपळपाडा येथील संकेत सुनील भोये (९) हा सकाळी सहा वाजता शेकोटी पेटवण्यासाठी  घराच्या कोपऱ्यात येऊन बसला. मात्र, त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुंपणातून उडी मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु आजी व त्याच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. 

‘ठाेस उपाययाेजना करा’गेल्या काही दिवसांपासून पशूंवर हल्ला करणारा बिबट्या आता माणसांवरही हल्ला करू लागल्याने वनविभाग याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी घटनास्थळी पाहणी करून पुढील कार्यवाही करणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विनोद दळवी यांनी दिली. 

संकेत सकाळी शेकोटी पेटवायला घराच्या बाहेर येऊन घराच्या कोपऱ्यावर बसला होता. त्याला बिबट्याने बघितले आणि  कुंपणावरून उडी मारून धावून आला; परंतु माझ्या आईने व घरातील व्यक्तींनी आरडाओरड केल्याने बिबट्या तिथून पळाला. संकेतला कोणतीही इजा झाली नाही, पळताना गुडघ्याला लागले आहे; परंतु या घटनेने आम्ही प्रचंड भीतीच्या वातावरणात आहोत. वनविभागाने तत्काळ उपाययोजना करावी.- केशव भोये,  संकेतचे काका 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard's Leap at Boy Near Fire; Family's Screams Save Him

Web Summary : In Mokhada, a nine-year-old boy was nearly attacked by a leopard while sitting near his house to light a fire. His family's screams scared the leopard away. Locals demand immediate action from the forest department.
टॅग्स :leopardबिबट्या