मोडक सागरमध्ये आज लेकटॅपिंग
By Admin | Updated: September 3, 2014 17:28 IST2014-09-03T02:27:02+5:302014-09-03T17:28:09+5:30
कोयना धरणानंतर पहिल्यांदाच ठाणो जिल्ह्यातल्या मोडक सागर धरणात आज लेकटॅपिंग करण्यात येणार आहे.

मोडक सागरमध्ये आज लेकटॅपिंग
मुंबई : कोयना धरणानंतर पहिल्यांदाच ठाणो जिल्ह्यातल्या मोडक सागर धरणात आज लेकटॅपिंग करण्यात येणार आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरही या लेकटॅपिंगच्या माध्यमातून बोगद्यातून पाणीपुरवठा करणो शक्य होणार आहे.
बुधवारी होणा:या या लेकटॅपिंगसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, महापौर सुनील प्रभू, आयुक्त सीताराम कुंटे यांची उपस्थिती असेल. या लेकटॅपिंगमुळे मोडक सागर तलावातील सर्वात खाली असलेला बोगदा खुला होणार आहे. या धरणात प्रस्तावित गारगाई धरणाचे पाणीदेखील भविष्यात आणले जाणार आहे. शहराच्या पाणीपुरवठय़ाच्या दृष्टीने हे लेकटॅपिंग मैलाचा दगड ठरणार आहे. (प्रतिनिधी)