बोईसर आगारातून १८ एसटी सोडल्या
By Admin | Updated: March 9, 2017 02:06 IST2017-03-09T02:06:47+5:302017-03-09T02:06:47+5:30
सफाळे येथे रूळावरून मालगाडी घसरल्यानंतर मुंबईकडे जाणारी व मुंबईहून येणारी असे दोन्ही मार्ग ठप्प झाल्यानंतर बोईसर येथे खोळंबलेल्या रेल्वे प्रवाशांकरिता बोईसर

बोईसर आगारातून १८ एसटी सोडल्या
बोईसर : सफाळे येथे रूळावरून मालगाडी घसरल्यानंतर मुंबईकडे जाणारी व मुंबईहून येणारी असे दोन्ही मार्ग ठप्प झाल्यानंतर बोईसर येथे खोळंबलेल्या रेल्वे प्रवाशांकरिता बोईसर आगारातून एकूण अठरा बसेस सोडून रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा दिला.
रेल्वे ठप्प झाल्यानंतर बोईसर एस.टी. आगारात मंगळवारी रात्री मोठया प्रमाणात रेल्वे प्रवाशांनी गर्दी केली त्या वेळी आगार व्यवस्थापक प्रमोद तेलवेकर यांनी अतिरीक्त बसेस, चालक व वाहकांची व्यवस्था करून विरार करीता तेरा तर डहाणू करीता पाच अशा एकूण अठरा बसेस सोडल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या घरी पोहचता आले.तर बोईसर एस. टी. आगारात प्रचंड मोठया प्रमाणात गर्दी उसळली होती. त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक के. एस. हेगाजे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह जातीने रात्री उशीरापर्यंत बोईसर आगारात उपस्थित होते. (वार्ताहर)