पाणीटंचाई असतांनाही अनेक जागी गळती

By Admin | Updated: May 3, 2016 00:33 IST2016-05-03T00:33:46+5:302016-05-03T00:33:46+5:30

संपूर्ण महाराष्ट्रसह पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील दुर्गम भाग आजही पाणीटंचार्इंनी व्याकुळ झाला असताना वाढीव पालघर व इतर २६ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे

Leaks at many places even when there is water scarcity | पाणीटंचाई असतांनाही अनेक जागी गळती

पाणीटंचाई असतांनाही अनेक जागी गळती

पालघर : संपूर्ण महाराष्ट्रसह पालघर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील दुर्गम भाग आजही पाणीटंचार्इंनी व्याकुळ झाला असताना वाढीव पालघर व इतर २६ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे व्हॉल्व्ह बारा महिने गळत असून सातपाटी, शिरगाव रत्यावरील पाइपलाइन फुटून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. ही पाण्याची सुरू असलेली नासाडी रोखण्याचे काम संबंधित विभाग, कार्यालये करीत नसल्याचे दिसून येत आहे.
वाढीव पालघर व इतर २६ गावे प्रादेशिक ग्रामीण नळपाणी पुरवठा योजनेच्या २० आॅक्टोबर २०११ रोजी २० कोटी ८१ लाख ८२ हजार इतक्या किमतीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर भूसंपादन इतर बदलामुळे व पालघर शहराचे नगरपालिकेत रुपांतर झाल्यामुळे योजनेच्या खर्चात वाढ झाली. सातपाटी, खारेकरण, मोरेकरण, उमरोळी, हरवाडी, शिरगाव, धनसार इत्यादी उंच गावाला पाणीपुरवठा व त्या अनुषंगाने कामाची व्याप्ती वाढली व खर्चात वाढ करण्यात येऊन ही योजना चार वर्षांपूर्वीपासून कार्यान्वित झाली.
मान्यता दिल्यानंतर जॅकवेलची उर्वरीत कामे पूर्ण करणे, गुरुत्ववाहिनी उर्ध्ववाहिनी, टाकी, जलशुद्धीकरण केंद्र, १९ जलकुंभ व वितरण व्यवस्था अशुद्ध पाण्याची पंपिंग मशिनरी, पीव्हीसी पाइप ऐवजी जी आय पाइप बदलणे इ कामे पूर्ण करण्यात आली. परंतु मागील चार वर्षांपासून देवखोपचे जलशुद्धीकरण केंद्र, देवखोप टेंभोडे पेट्रोलपंप, धनसार, शिरगाव, सातपाटी इ. भागतील व्हॉल्व्ह आजही गळतच आहेत. तर शिरगाव चुनाभट्टी, सर्वोदय संस्थेचे वळण, श्रराम मंदिर स्टॉप, हुतात्मा स्मारक या भागातील पाइपलाईन वर्ष भरात अनेक वेळा फुटून लाखो लिटरची पाण्याची नासाडी होत आहे. दुरुस्त्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च दाखविला जात असताना पाण्याच्या गळत्या मात्र थांबलेल्या दिसून येत नाही. सातपाटीच्या हुतात्मा स्मारकांजवळ काल रात्रीपासून मोठ्या प्रमाणात जमिनीखालची पाइपलाईन फुटून शेकडो लिटर्स पाणी वाया जात असून त्यावर उपाययोजना केली जात नसल्याने केली जात नसल्याने पाणी वाया जाण्याचे प्रमाण सुरूच आहे. जव्हार, विक्रमगड, मोखाडा भागतील जनता एक एक थेंब पाण्यासाठी मोठी पायपीट करीत असताना मात्र पाण्याची गळती रोखण्याची तयारी प्रशासन घेत नसल्याने पालघारलाही पाण्याच्या मोठ्या कपातीचा सामना करावा लागू शकतो. (प्रतिनिधी)

Web Title: Leaks at many places even when there is water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.