शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

बोर्डीत कडक लक्ष्मीचे आगमन

By admin | Updated: December 14, 2015 00:39 IST

दरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात कोल्हापूरहून आलेल्या कडकलक्ष्मीचे आगमन डहाणू तालुक्यातील खेडोपाड््यात झाले आहे. तिचे भक्तीभावाने आशिर्वाद घेणाऱ्या सुवासिनी

अनिरुद्ध पाटील,  बोर्डीदरवर्षीप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात कोल्हापूरहून आलेल्या कडकलक्ष्मीचे आगमन डहाणू तालुक्यातील खेडोपाड््यात झाले आहे. तिचे भक्तीभावाने आशिर्वाद घेणाऱ्या सुवासिनी आणि या पथकाच्या मागोमाग गावभर फिरणाऱ्या लहान मुलांचा ताफा बघून आधुनिक काळातही ग्रामसंस्कृतीत परंपरागत सांस्कृतिक ठेव्याचे महत्व तसूभरही कमी झाला नसल्याची प्रचिती येते.मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महालक्ष्मी व्रतांचा प्रारंभ होतो. या काळात डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात भक्तांची गर्दी दिसून येते. कोल्हापूरहून कडकलक्ष्मी याच काळात येते. या परिसरातील गावामध्ये ढोलके घुमवित उघड्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारुन घेणाऱ्या पोतराजासह कडकलक्ष्मीचे आगमन झाले आहे. लक्ष्मीचा मुखवटा घेतलेली महिला गल्ली बोळातील घरोघरी फिरुन भक्तजनांना आशिर्वाद देत असते सुवासिनी तिची भक्तीभावाने पूजा करीत असतात. हे दृष्य पाहून अनेक पिढ्या बदलल्या. मात्र गावगाडा पूर्वी सारखाच चालत आल्याचे बुजुर्ग महिलांनी सांगितले.खडोपाड्यात आधुनिकतेचा शिरकाव झाला आहे. देवावरील श्रद्धा आणि व्रताचे पालन करण्याची पद्धती बदलली परंतु काळानुरुप थोड्याफार फरकाने परंपरा कायम असल्याचे चिखले गावातील स्नेहल पाटील यांनी म्हटले आहे. या पथकासह सेल्फी घेण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही.कडकलक्ष्मीनेही काळानुरुप बदल केल्याचे प्रकर्षाने दिसून आले. पारंपारिक घुमण्याऐवजी, नव्या पद्धतीची ढोलकी वापरली जात असून वेषभूषाही बदलली आहे. कुटुंबाची आर्थिक घडी बसविण्याकरीता लहानमुलांनाही पोतराज बनवून चाबकाचे फटकारे मारुन घ्यावे लागत असल्याचे वास्तव कोल्हापूरहून आलेल्या कडकलक्ष्मीच्या भक्त महिलेने कबूल केले.मार्गशीर्षात महालक्ष्मी व्रताचे पालन केले जाते. या काळात कोल्हापूरात जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेणे सर्वांनाच शक्य नाही. परंतु कडकलक्ष्मी पथकाच्या माध्यमातून हे भाग्य लाभते.- सौ. अर्चना पंकज पाटीलचिखले गावातील महिला.