शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

अखेरच्या दिवशी प्रचार शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 6:28 AM

मतदारसंघाच्या फेररचनेनंतर पूर्वीच्या वाडा विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन विक्रमगड हा निर्माण झालेला नविन विधानसभा मतदारसंघ आहे़ जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील कंचाड मिळुन तो तयार झालेला आहे़

विक्रमगड - मतदारसंघाच्या फेररचनेनंतर पूर्वीच्या वाडा विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन विक्रमगड हा निर्माण झालेला नविन विधानसभा मतदारसंघ आहे़ जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यातील कंचाड मिळुन तो तयार झालेला आहे़ यात ११०५१ मतदारांचा नव्याने समावेश झालेला असून २ लाख ५३ हजार १८४ (पुरुष-१२८८२५ व स्त्री-१२४५९) मतदार येत्या २८ एप्रिल रोजी होणा-या लोकसभेच्या पोट निवणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत़लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले भाजपा (राजेंद्र गावित), बहुजन विकास आघाडी (बळीराम जाधव), शिवसेना (श्रीनिवास वनगा), कॉगे्रस-राष्टÑ्वादी(दामोदर शिंगडा) आघाडी, माकप, व इतर अपक्ष मिळून ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असल्याने चुरशीची अशी पंचरंगी लढत होत आहे़ मात्र खरी लढत ही भाजपा, बहुजनविकास आघाडी व शिवसेना यांचेमध्ये अपेक्षीत आहे़. शनिवारी प्रचाराचा शेवट दिवस असल्याने प्रत्येक उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते, मोटर सायकल रॅली, तसेच मतदारांच्या घरी गल्ली-बोळातून फिरतांना दिसत आहेत़ आमच्या उमेदवारांना मतदान करा असा आग्रह धरत आहेत़ त्यामुळे सर्वच परिसर प्रचारमय झालेला दिसत होता. येथे आदिवासी समाजाचे प्राबल्य जास्त आहे़ परंतु जव्हार मोखाडा व विक्रमगड हे भाग विकासापासून दूर आहेत, असे येथील मतदार बोलून दाखवित आहेत़ त्यामुळे येथील गाव -खेडयातील काही मतदार नोटा बटनाचा वापर करू असे खाजगीत सांगत आहेत. त्यामुळे यावेळी तरी मतदान करतांना आपल्या भागाचा विकास काय केला यावर उमेदवारांचे भवितव्य मतदार ठरविणार आहेत़विक्रमगड तालुक्याच्या निर्मीतीपासून येथील आदिवासींच्या नावाने हजारो कोटी रुपये कागदोपत्री खर्च होतांना दिसत आहेत परंतु गेल्या ६७ वर्षात या भागाचा विकास करणारा सक्षम लोकप्रतिनिधी अर्जुन या भागात मिळालेला नसल्याची खंत येथील मतदार व्यक्त करीत आहेत़ याचा परिणाम गेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमगड विधानसभा मतदार संघातून झालेल्या ४९ टक्के मतदानाने मतदारांनी आणून दिला आहे. प्रत्येकवेळी उभे असलेले उमेदवार तेच-तेच असल्याने मतदार कंटाळलेले आहेत़ गेल्या ६७ वर्षापासून येथील दऱ्या-खोºयातील आदिवासी त्याच हालअपेष्टांमध्ये जीवन जगत आहेत़ गावात त्यांना जगण्यासाठी रोजगार नसल्याने पावसाळा संपताच ८ महिने काम मिळेल अशा शहरांच्या ठिकाणी आपली मायभूमी सोडून स्थंलातर करीत आहेत़ तसेच रस्ते, शिक्षण, निवारा, उत्पादीत शेतमालाला हमी भाव नाही, औद्योगीक वसाहतींचा अभाव, पाणी वीज सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता याचा अभाव असलेले जीणे जगत आहेत.निकाल ३१ मे रोजी पालघर येथे ३ दिवस मतपेट्यामूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात लोकप्रतिनिधींना सपशेल अपयश आलेले आहे़ या भागात अजूनही कुपोषणाचे प्रमाण कमी झालेले नाही़ वीज भारनियमन, दरवर्षी उदभवणारी भीषण पाणी टंचाई, बंद पडलेल्या नळ पाणी योजना या सर्व समस्यांची विकासाच्या दृष्टीने सोडवणूक व्हायला हवी व यातून बाहेर काढणारा लोक प्रतिनिधी हवा असे मतदारांचे म्हणणे आहे़ त्यामुळे हया निवडणुकीत नुसती आश्वासने देऊन चालणार नाही तर मतदारांना प्रत्यक्ष कृती हवी आहे़ तरच यापुढे लोकप्रतिनिधींचा टिकाव लागणार आहे़ आज या ०७ उमेदवारांकरीता सहा विधानसभा कार्यक्षेत्रातील १७ लाख २४ हजार ००६ मतदारापैकी पुरुष मतदार-९०३७८० व स्Þित्रया मतदार-८२०१४० व इतर ८६ मतदानाचा हक्क बजावणार आहेत़ त्यासाठी सोमवारी २८ मे रोजी निवडणूक होत आहे़ मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला निवडणुकीचा प्रचार थांबला असून उमेदवार सोमवारी होणा-या मतदानाच्या तयारीला लागले आहेत़ पालघर लोकसभेच्या सहा विधानसभा क्षेत्रात सोमवारी होणा-या निवडणुकीत मतदाराचे भवितव्य मतपेटीत बंद होउन त्याचा निकाल जाणून घेण्यासाठी गुरूवारपर्यंतची प्रतिक्षा करावी लागणार आहे़

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018