शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ जमीन बांधकाम खात्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:34 IST

एनपीसीआयएलने कोर्टात दावा सुरू असल्याचे सांगून मज्जाव केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या विनंती नुसार ही जमीन जिल्हा शल्यचिकित्सक (पालघर) यांनी सा. बा. खात्याकडे सुपूर्द केल्याने आता सा. बा. खाते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बोईसर : येथील प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या जागेवर संरक्षक भिंत बांधण्यास एनपीसीआयएलने कोर्टात दावा सुरू असल्याचे सांगून मज्जाव केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या विनंती नुसार ही जमीन जिल्हा शल्यचिकित्सक (पालघर) यांनी सा. बा. खात्याकडे सुपूर्द केल्याने आता सा. बा. खाते काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.संरक्षक भिंत बांधणारे ठेकेदार मे. शिवसाई कन्स्ट्रक्शन यांनी या जागेवर काम करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली असता एनपीसीआयएलने कामास मज्जाव केला. नंतर सा. बां. उपविभाग पालघर विभागाच्या उप विभागीय अभियंत्यांनी पालघरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून आपल्या स्तरावरून बांधकामासाठी योग्य ती कार्यवाही करून ही जागा या कार्यालयाच्या ताब्यात देवून त्याचे सीमांकन प्रत्यक्ष जागेवर आपल्या विभागामार्फत करून द्यावी अशी विनंती केली होती. त्या विनंती पत्रानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी १ डिसेंबर १८ रोजी सा. बां. ला पाठविलेल्या पत्रात जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती पालघर यांचे प्रशासकीय आदेशा नुसार ग्रामीण रुग्णालय बोईसर येथील सर्व्हे क्रमांक १०८ ए/३० पैकी २.५० एकर जागेवर संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली असून त्यानुसार आपणास निधी वितरीत करण्यात आलेला आहे तरी सदर जागेवर बांधकाम करण्यासाठी या कार्यालयाकडून उपरोक्त जागा सुपूर्द करण्यात येत असून काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंती वजा सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर आजची ही घडामोड महत्वपूर्ण ठरली आहे. आतातरी या कामाला गती मिळावी, अशी येथील जनतेची इच्छा आहे.>आता कामाला गती२००३ साली बोईसर ग्रामीण रुग्णालय मंजूरझाल्या नंतर मागील १५ वर्ष हा प्रश्न विविध खात्याच्या लाल फितित अडकून पडण्या बरोबरच न्यायालयातही गेल्याने प्रलंबित आहे त्यामुळे हजारो गोर गरीब मोफत व सुसज्ज सेवे पासून इतकी वर्षे वंचित आहेत.आता चेंडू सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असून ते बांधकाम सुरु करतात की नाही या बरोबरच काम पुन्हा सुरु केल्या नंतर एनपीसीआयएलची भूमिका काय असणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.