शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी ग्रामस्थच उभारतात लाखोंची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 02:20 IST

कोचाईचा समाजात आदर्श ठरावा असा पायंडा : लग्नघर कर्जबाजारी होऊ नये म्हणून आर्थिक मदत

सुरेश काटे।लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : सध्या लग्नसराईचे दिवस सुरू झालेत आणि लग्न म्हटलं की खर्च हा आलाच. आदिवासी भागामध्ये कार्यामध्ये मानपान, लग्न मंडप, वाजंत्री, डीजे, खानपान इत्यादीसाठी लाखो रु पये खर्च करावा लागतो. बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये लोकलाजेस्तव कर्ज काढावे लागते. लग्नात होणारा अमाप खर्च एखाद्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर होऊ नये यासाठी तालुक्यातील कोचाई गावातील ग्रामस्थांनी समाजात आदर्श ठरावा असा पायंडा पाडला आहे.

गावातील नोकरी, व्यवसाय, शेती व रोजगार हमीवर असणारे १०० ते १५० ग्रामस्थांनी एकत्र येऊन लग्नकार्य असलेल्या कुटुंबासाठी आर्थिक मदतरूपाने पैसे उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीत बसणारे प्रत्येक ग्रामस्थ स्वत:च्या ऐपतीप्रमाणे १००० ते ५ हजार रु पये पर्यंत जमा करून रक्कम लग्न कुटुंबातील प्रमुख व्यक्तीकडे देतात. एकत्र जमा केलेली रक्कम साधारण एक दीड लाखाच्या घरात गोळा होत असल्याने लग्न घराला मोठा हातभार लागत आहे.

तालुक्यातील आदिवासी समाजामध्ये लग्नात मांसाहारी जेवणाबरोबरच पाहुण्या मंडळींसाठी ताडीला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे लग्नात सरासपणे ताडी, कोल्ड्रिंक्स बरोबरच मद्यपान करण्यात येतो. या बांधीलकीमुळे खर्चाचा भार काहीसा कमी होऊन सामाजिक बांधिलकी ही जपली जात असल्याने एकमेकांविषयी आदर निर्माण होऊ लागला आहे.

बारा वर्षांपासून जपलेली बांधीलकीकोचाई गावातील हा अभिनव उपक्र म ग्रामस्थ दहा ते बारा वर्षांंपासून राबवत आहेत. ह्याच अभिनव उपक्र मातून आर्थिकमदतीचा हातभार लागेल्या गावातील महेश अंधेर व संदीप अंधेर या दोन भावंडांचा ६ एप्रिल रोजी आदिवासी परंपरेनुसार थाटामाटात लग्न पार पडले. बैठकीतील ग्रामस्थ लग्न व्यवस्थित पार पडे पर्यंत नियोजनात ही सहभागी होऊन एकमेकांमधील बांधिलकी जपत असतात.आदिवासी समाजात लग्न जुळल्यानंतर वधूला (देज) दिला जातो. यामध्ये तांदूळ, कडधान्य आणि वधूपक्षाला देण्यात येणारी ठरलेली ठराविक रक्कम असते. त्याच बरोबर वधूला लग्नासाठी नववधू शुंगार व कपडेही दिले जातात.