लाखाच्या दुचाकीचा मालक केनीथ डिसुझा

By Admin | Updated: January 16, 2016 00:21 IST2016-01-16T00:21:19+5:302016-01-16T00:21:19+5:30

४ जानेवारीला अमेरिका बनावटीची इंडियन दुचाकी रजिस्ट्रेशनसाठी विरारच्या आरटीओ कार्यालयात आल्यावर या दुचाकीचे फोटो फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून तरूणांची

Lakhau's two-wheeler owner Kenneth D'Souza | लाखाच्या दुचाकीचा मालक केनीथ डिसुझा

लाखाच्या दुचाकीचा मालक केनीथ डिसुझा

पारोळ : ४ जानेवारीला अमेरिका बनावटीची इंडियन दुचाकी रजिस्ट्रेशनसाठी विरारच्या आरटीओ कार्यालयात आल्यावर या दुचाकीचे फोटो फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून तरूणांची मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर मोठा गवगवा झाला. या दुचाकीचा मालक आ. हितेंद्र ठाकूर यांचा मुलगा उत्तुंग ठाकूर असून
तिची किंमत १० कोटीवर सोशल
मीडियाने नेऊन ठेवली पण ही दुचाकी उत्तुंग ठाकूर यांची नसून वसईचे
उद्योगपती केनीथ डिसुझा हे खरे मालक आहेत.
डिसुझा यांना महागड्या गाड्यांचा छंद असून त्यांच्याकडे विदेशी बनावटीच्या हार्डली डेव्हिसन, बीटी, निंजा, हायाबुसा या दुचाकी असून त्यांनी १७ सप्टेंबर २०१५ ला या दुचाकीची बुकींग केली होती. तर ४ जानेवारी २०१६ ला या दुचाकीला पासींगसाठी विरार आरटीओ कार्यालयात आणण्यात आले होते. १८११ सीसी क्षमतेची ही दुचाकी असून तीची किंमत ३० लाख रू. आहे.
या दुचाकीची कागदपत्रे कायदेशीर असून मालकाकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे. तसेच या गाडीची किंमत कोटीच्या घरात नसून लाखाच्या घरात आहे.
भारतामध्ये अशा प्रकारच्या विदेशी दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी होतात. त्यामुळे गाडीची खोटी किंमत व खोट्या मालकाची नावे टाकून सोशल मीडियावर टाकणे ही चुकीची बाब असल्याचे परिवहन अधिकारी देशपांडे यांनी सांगितले.

Web Title: Lakhau's two-wheeler owner Kenneth D'Souza