विक्रमगडच्या तलावाची अनेक वर्षे होतेय दुर्दशा

By Admin | Updated: April 20, 2017 23:55 IST2017-04-20T23:55:11+5:302017-04-20T23:55:11+5:30

ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या विशेष घटक योजनेतील तलावाचे प्रशासनानने सुशोभीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Lack of Vikramgad lake for many years | विक्रमगडच्या तलावाची अनेक वर्षे होतेय दुर्दशा

विक्रमगडच्या तलावाची अनेक वर्षे होतेय दुर्दशा

विक्रमगड : ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या विशेष घटक योजनेतील तलावाचे प्रशासनानने सुशोभीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
तालुका निर्मीतीपासून ही मागणी दुर्लक्षित असून सध्या या तलावाचा उपयोग आजूबाजूच्या पाडयातील रहिवाशी कचरा टाकण्यासाठी करीत आहेत. पतंगेश्वर मंदिरासमोर पिण्याच्या पाण्याची विहीर असून त्या लगतच मोठा पुरातन तलाव आहे. त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले असल्यामुळे तो वर्षानुवर्षे स्वच्छ केला गेला नाही.
तलावाच्या आजूबाजूला सर्वत्र गवत उगवल्याने तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. त्या ठिकाणी असलेल्या झाडीमुळे तलाव आहे की, नाही तेच समजत नाही. पाच ते सहा वर्षापूर्वी आमदार निधीचा वापर करून विशेष घटक योजनतून लाखो रु पये खर्च करुन या तलावातील घाण, गाळ, काढून तलाव स्वच्छ करुन संरक्षक भिंत व घाट बांधण्यापर्यतचे काम करण्यांत आले. त्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून या तलावाच्या देखभालीकडे व स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने त्याची दुरवस्था झाली आहे.
त्याचे सुशोभिकरण केल्यास गावकऱ्यांना विरंगुळ्याचे चांगले स्थान उपलब्ध होईल, अशी भावना गावात व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Lack of Vikramgad lake for many years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.