निलेश सांबरे यांना कुणबी समाज भूषण पुरस्कार

By Admin | Updated: May 12, 2017 01:21 IST2017-05-12T01:21:38+5:302017-05-12T01:21:38+5:30

पालघर व ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक, शैक्षणिक, क्र ीडा व आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या निलेश भगवान सांबरे

Kunshi Samaj Bhushan Award by Nilesh Sambare | निलेश सांबरे यांना कुणबी समाज भूषण पुरस्कार

निलेश सांबरे यांना कुणबी समाज भूषण पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : पालघर व ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक, शैक्षणिक, क्र ीडा व आरोग्य सेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या निलेश भगवान सांबरे यांना ‘कुणबी समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री विष्णु सवरा, खासदार चिंतामण वनगा, आ.शांताराम मोरे, आ.पांडुरंग बरोरा व माजी आमदार मोतीराम पवार यांच्या हस्ते सांबरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निलेश भगवान सांबरे हयांचा पालघर व ठाणे जिल्ह्यात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात महत्वाचा सहभाग राहिला आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक, आदिवासी सेवा मंडळ मुंबई चे अध्यक्ष विश्वात्मक जंगली महाराज हायस्कूल चे उपाध्यक्ष तर विक्रमगड कला क्रीडा महोत्सव चे ते अध्यक्ष आहेत.
सामाजिक क्षेत्रात सांबरे यांनी दोन्ही जिल्ह्यातील सामान्य नागरीकांसाठी अल्प दरात उच्च प्रतीची आरोग्य सेवा, मोफत एम. पी. एस. सी व यु. पी. एस. सी चे क्लासेस, विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक क्लासेस तर १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस, मोफत ओमकार अंध व मतीमंद निवासी शाळा, जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी मोफत वाचनालय व दरवर्षी कला क्र ीडा महोत्सव चे आयोजन केले जाते. सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यसेवा क्षेत्रात काम करत असताना त्यांना विविध संकटांना सामोरे जाण्याची वेळ आली. परंतु न डगमगता त्यांनी प्रत्येक संकटांवर यशस्वीपणे मात करीत ते ठामपणे उभे राहिले.
त्यांच्या ह्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Web Title: Kunshi Samaj Bhushan Award by Nilesh Sambare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.