कुत्र्याची हत्या : एकाला अटक
By Admin | Updated: May 30, 2014 01:08 IST2014-05-30T01:06:00+5:302014-05-30T01:08:20+5:30
भटक्या कुत्र्याला मारहाण करणे चारकोपच्या महाविरनगरात राहाणार्या दोघांच्या अंगलट आले आहे. मारहाणीत या कुत्र्याचा मृत्यू झाला

कुत्र्याची हत्या : एकाला अटक
मुंबई : भटक्या कुत्र्याला मारहाण करणे चारकोपच्या महाविरनगरात राहाणार्या दोघांच्या अंगलट आले आहे. मारहाणीत या कुत्र्याचा मृत्यू झाला. प्राणीमित्रांनी हे प्रकरण पोलीस ठाण्यात नेले. अखेर या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला. त्यापैकी एकाला अटकही करण्यात आली. हरिप्रसाद अमीन(५९) आणि सुदर्शन गुप्ता अशी दोघांची नावे आहेत. त्यापैकी अमीन यांना चारकोप पोलिसांनी प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलमांनुसार अटक केली. सुदर्शन यांचा शोध सुरू आहे. हा भटका कुत्रा भुंकत असल्याने दोघांनी त्याला मारहाण केली. कुत्र्याला परिसरातील प्राणीमित्रांनी रूग्णालयात नेले. तोवर त्याचा मत्यू झाला होता.