शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

विरारच्या खाकी वर्दीची सहृदयता, कोर्टही धावले मदतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 03:09 IST

जिने सर्वासाठी आयुष्यभर कष्ट सोसलं, स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन लेकरांची पोट भरली आज तिलाच पोटाची खळगी भरण्यासाठी भिक मागावे लागत आहे. तिचा गुन्हा एवढाच की तिला दुर्धर आजाराने विळखा घातला होता.

- हनीफ पटेलविरार : जिने सर्वासाठी आयुष्यभर कष्ट सोसलं, स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन लेकरांची पोट भरली आज तिलाच पोटाची खळगी भरण्यासाठी भिक मागावे लागत आहे. तिचा गुन्हा एवढाच की तिला दुर्धर आजाराने विळखा घातला होता. त्यामुळेच तिच्या घरच्यांनी तिला वाऱ्यावर सोडलं. याचा इतका आघात तिच्या वर झाला की तिच्या स्मृतींनीही आता तिची साथ सोडली आहे. त्यामुळे लोक तिला आता वेडी म्हणत आहेत.ही कहाणी आहे, एका ७५ वर्षीय म्हातारीची. ती कुठून आली, ती कुठली, तिचे नातेवाईक कोण, तिचे नेमके नाव काय या कोणत्याही प्रश्नाचे तिच्याकडे कोणतही उत्तर नाही. आणि जे समोर आहे ते इतकं विदारक आहे की तिला कोणी स्वीकारत ही नाही. तिला इतक्या विकारांनी ग्रासलं आहे की आता तिच्यावर कुणी उपचार करायला सुद्धा तयार होतं नाही.ही म्हातारी विरार पोलिसांना रस्त्यावर सापडली. मृत्यूच्या शयेवर ती आपले अंतिम श्वास घेत होती. तिच्या सर्वांगावर जखमा होत्या त्यातून रक्त वाहत होते. तिचे कपडे फाटले होते. ती भिक मांगत होती. विरार पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात आणलं तिच्यावर उपचार सुरू केले. तिला खाऊ पिऊ घातले.तिची वैद्यकीय तपासणी ही केली त्यावेळी कळले की तिला दुर्धर आजारानं ग्रासले आहे. पोलिसांना वाटले की तिला उपचार मिळाल्यास ती बरी होईल. पण तिला कोणतेही रुग्णालय दाखल करून घेण्यास तयार झाले नाही. त्यांनी तिला स्थानकात ठेऊन तिच्यासाठी एक महिला व पुरूष पोलीस तैनात ठेवला. चार दिवस तिची शुश्रशा केली. शेवटी कोणीच तिला ठेवण्यासाठी तयार नसल्याने पोलिसांनी न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने ठाणे सिव्हील रुग्णालयाला तिच्यावर उपचार करण्याचे आदेश दिले.तपासाअंती तिची बडबड ठरली व्यर्थविरार पोलिसांची ही माणुसकी खरोखरच आदर्शवत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ही महिला आपलं नाव पुष्पलता सावंत असल्याचे सांगते आहे. मी दादर ला राहत असून मला तीन मुलं आणि एक मुलगी असल्याचे व माझे पती शिक्षक होते असेही ती सांगते. पण ही माहिती पोलिसांनी तपासून पाहिली असता अशा प्रकारचा कोणताही परिवार आढळून आला नाही. यामुळे जर बातमीच्या माध्यमातून या महिलेचे कुणी नातेवाईक सापडले तर त्यांनी तिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जाऊन भेटावे. असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरार