खंडणीसाठी अपहरण
By Admin | Updated: May 3, 2016 00:30 IST2016-05-03T00:30:22+5:302016-05-03T00:30:22+5:30
३ लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला अटक केली असून चिमुकल्याची

खंडणीसाठी अपहरण
वसई : ३ लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी वालीव पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला अटक केली असून चिमुकल्याची सुखरुप सुटका करून त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
धानीवबाग येथे राहणारे रिक्षाचालक राजकुमार चौरसिया यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रतिक २५ एप्रिलला सकाळी घराबाहेर खेळत असताना ९.३० सुमारास अचानक गायब झाला होता. याप्रकरणी त्यांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासात चौरसिया यांच्या शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय मुलाने पोलीस तपासात गुन्हयाची कबुली देऊन पुढील माहिती दिल्याने पोलिसांनी आरोपीला प्रतिकसह ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाने तीन लाखाच्या खंडणीसाठी त्याचा मित्र गणेश बिद (१९) याच्यासह प्रतिकच्या अपहरणाचा कट रचला होता. त्या मुलाने घराबाहेर खेळत असलेल्या प्रतिकला पळवून गणेशच्या ताब्यात दिले. गणेश प्रतिकला घेऊन लगेचच उत्तरप्रदेशातील आपल्या मूळ गावी पळून गेला. पोलिसांनी ही माहिती मिळाल्यानंतर उत्तरप्रदेश येथील खालीसपूर गावी जाऊन गणेशला अटक केली. (प्रतिनिधी)