खोडकांनी शोधला बिनविजेचा पंप

By Admin | Updated: January 2, 2017 03:33 IST2017-01-02T03:33:44+5:302017-01-02T03:33:44+5:30

अनेकदा जवळ पाण्याचे स्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी आणता येत नाही. काहींना तिच्या मोटरसाठी लागणारा इंधन खर्च परवडत नाही

Khodak discovered uninterrupted pump | खोडकांनी शोधला बिनविजेचा पंप

खोडकांनी शोधला बिनविजेचा पंप

पंकज पाटील, बदलापूर
अनेकदा जवळ पाण्याचे स्रोत असूनही वीज नसल्याने शेतीसाठी पाणी आणता येत नाही. काहींना तिच्या मोटरसाठी लागणारा इंधन खर्च परवडत नाही. यावर बदलापूरजवळील चोण गावात राहणाऱ्या रामचंद्र खोडका या आदिवासी समाजातील व्यक्तीने या समस्येवर उपाय शोधला आहे. जुजबी यांत्रिक कौशल्याच्या बळावर पाण्याच्याच प्रवाहाचा वापर करून विनाइंधन पाणी उपसा करणारे यंत्र त्यांनी तयार केले आहे. त्यातून ते शेतीला पाणी पुरवतात, पण लवकरच त्यावर वीजनिर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या चोण गावाजवळून वाहणाऱ्या बारवी नदीच्या प्रवाहात त्यांनी हे यंत्र बसविले असून त्याद्वारे कोणतेही इंधन न वापरता पाणी उपसले जात आहे. या यंत्राच्या पेटंटसाठीही त्यांनी अर्ज केला आहे.
आयटीआयमधून वेल्डरचा पदविका अभ्यासक्र म पूर्ण केलेल्या खोडका यांनी काही काळ स्वत:चे वर्कशॉप टाकून व्यवसाय केला. नंतर राज्य परिवहनच्या कर्जत आगरात तांत्रिक कारागिर म्हणून त्यांची नेमणूक झाली. नोकरीबरोबरच चोण गावात ते शेतीही करतात. गावालगत नदी असूनही विजेअभावी त्यांना शेतीसाठी पाणी उपसून आणता येत नव्हते. डिझेलवर मोटर चालविणे परवडणारे नव्हते. त्यामुळे कोणत्याही इंधनाचा वापर न करता नदीतले पाणी उपसून आणता येईल का, याचा विचार ते करू लागले.

Web Title: Khodak discovered uninterrupted pump