खारेकुरणच्या मानपाड्यात दारुअड्डा उद्ध्वस्त
By Admin | Updated: May 13, 2017 00:39 IST2017-05-13T00:39:56+5:302017-05-13T00:39:56+5:30
खारेकुरणच्या मानपाडा येथील एका शेतात गावठी दारू बनाविण्यावचा मोठा अड्डा पालघरचे पोलीस निरीक्षक संजय हजारे ह्यांनी

खारेकुरणच्या मानपाड्यात दारुअड्डा उद्ध्वस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : खारेकुरणच्या मानपाडा येथील एका शेतात गावठी दारू बनाविण्यावचा मोठा अड्डा पालघरचे पोलीस निरीक्षक संजय हजारे ह्यांनी उध्वस्त करून सव्वा लाखांचा ऐवज जप्त करीत दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केले आहेत.
जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात काळ्या गुळाची विक्री सुरू आहे. त्यामुळे हातभट्टी दारूच्या अड्ड्यात मोठी वाढ होत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अनास्थेमुळे पोलीस विभागाला त्यांची अतिरिक्त जबाबदारी उचलून कारवाई करावी लागत आहे. पालघर खारेकुरण रस्त्यावर मानपाडा मिठागर रस्त्यावरील एका शेतात मोठ्या प्रमाणात दारू बनविली जात असल्याची माहिती पो.नि. हजारे ह्यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस शिपाई रघुनाथ खरीवले व पथकाने गुरुवारी दारू अड्ड्यावर धाड घातली. ह्यावेळी दारू बनविणाऱ्या हृषीकेश भूपेंद्र मोरे (२६) आणि कृष्णा अर्जुन गुणगुने (२९) ह्या आरोपीना ताब्यात घेतले. ह्या कारवाईत ८० हजार किमतीचे २०० लीटर क्षमतेचे २५ ड्रम, एक मोटारसायकल सह सुमारे १ लाख १७ हजार २०० रु पयांचा माल ताब्यात घेऊन जाळून टाकला.
पालघर शहारातूनही ह्या काळा गुळ विक्री करणारा व्यापारांचा व्यवसाय मोठ्या तेजीत सुरु आहे. नांदगाव, शिरगाव, वडराई, सफाळे, धनसार आदी भागातील निर्मनुष्य जागा, वाडी शोधून त्या ठिकाणी हे दारूचे अड्डे सुरु आहेत.