केतन जाधवने केले एव्हरेस्ट पादाक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 02:27 AM2019-05-27T02:27:23+5:302019-05-27T02:27:30+5:30

केतन सीताराम जाधव या इयत्ता अकरावीतील आदिवासी विद्यार्थ्याने जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर २३ मे रोजी पहाटे ५.१० वाजता पादाक्रांत केले.

 Ketan Jadhav made Everest tremendously | केतन जाधवने केले एव्हरेस्ट पादाक्रांत

केतन जाधवने केले एव्हरेस्ट पादाक्रांत

Next

वाडा : माधवराव काणे अनुदानित आश्रम शाळा, देवगाव, ता.वाडा, जि.पालघर येथील केतन सीताराम जाधव या इयत्ता अकरावीतील आदिवासी विद्यार्थ्याने जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर २३ मे रोजी पहाटे ५.१० वाजता पादाक्रांत केले. त्याबद्दल पालक मंत्री विष्णू सवरा यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेल्या मिशन शौर्य २०१९ या एव्हरेस्ट मोहिमेत केतन जाधव याच्यासह एकूण नऊ आदिवासी विद्यार्थ्यांची निवड झाली होती. विविध ठिकाणी घेतलेल्या खडतर प्रशिक्षणानंतर हा चमू एव्हरेस्ट पादाक्र ांत करण्यासाठी गेला होता. २३ मे रोजी भल्या पहाटे या नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास घडवला आहे. ही मोहीम यशस्वी केलेले सुग्रीव, सुरज, अंतुबाई, चंद्रकला, मनोहर, मुन्ना, अनिल, हेमलता आणि केतन हे ते नऊ एव्हरेस्ट वीर होत.
या धवल यशाबद्दल या सर्व एव्हरेस्ट वीरांचे अभिनंदन करण्याबरोबरच मोहीम पूर्ण करण्यात योगदान दिलेल्या आदिवासी विकास विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे सवरा यांनी आभार मानले आहेत.

Web Title:  Ketan Jadhav made Everest tremendously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.